*मला शाल नको, गुच्छ नको*
*सदस्य द्या - डॉ. रवींद्र कुटे*
हिंगोली प्रतिनिधी:
इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम.ए.) चे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे हे सध्या मराठवाडा व विदर्भ दौऱ्यावर आहेत,येथील शाखांच्या बैठकी दरम्यान ते हिंगोली येथे आले होते.यावेळी हिंगोलीतून ५० सदस्यांनी संस्थेचे सदस्यत्व प्राप्त केले आहे.
हिंगोली ही आय एम ए ची मोठी व महत्वपूर्ण शाखा असून या शाखेचे आदर्शवत असे काम चालु आहे. आय एम ए हॉल कामे पूर्णत्वास आले आहे. ही बाब खुपच अभिमानास्पद आहे.
डॉ.कुटे हे आय एम ए हिंगोली शाखेच्या भेटीसाठी आले असता हिंगोली आय एम ए सदस्य आणि पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
या संस्थेत सध्या नवीन सदस्यांना मोठा वाव आहे,अशावेळी मला शाल,श्रीफळ व गुच्छ न देता जास्तीत जास्त सदस्य द्या असे आव्हानात्मक उद्गार आय एम ए महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे यांनी काढले.
आय एम ए हिंगोली अध्यक्ष डॉ. सचीन बगाडीया, सचिव डॉ. यशवंत पवार, खजिनदार डॉ. महारूद्र भोसले यांनी तब्बल ५० नवीन सदस्य दिले.दिवसेंदिवस आय एम ए मध्ये सदस्य संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
आय एम ए या संस्थेने जवळपास १५ हजार टी.बी.या रोगाचे (क्षयरोगी) रुग्ण उपचार करण्याकामी दत्तक घेतलेली असुन त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार सुरू आहेत, यातील बहुतांश रुग्ण आगदी ठणठणीत देखील झाले आहे,तसेच संस्थेद्वारे घेण्यात येत असलेल्या रक्तदान शिबीराने ६२९२ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत मोठा विक्रम केलेला आहे, या संस्थेची सदस्य संख्या ही जवळपास ५० हजारापर्येंत पोहचली असुन गत ९-१० महिन्यांच्या कालावधीत या संस्थेने ५ हजाराच्यावर सदस्य संख्या जोडली आहे, डॉक्टर रवींद्र कुटे यांच्या केवळ ९-१० महिन्यांच्या राज्य अध्यक्षपदाच्या कालावधीत आय एम ए. ने विविध सामाजाभिमुख ऊपक्रमाचा मोठा विक्रम केला असल्याचे दिसून येत आहे.
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

