पहीले बक्षिस एस.के.सोमय्या
तर दुसरे भोसलेवाडी शाळेला
बेलापूर प्रतिनिधी:-
विद्यार्थ्यांच्या शारिरीक बौद्धिक वाढीसाठी तृणधान्य महत्वाचे असुन शासनाच्या प्रधानमंत्री पोषण आहार योजनेंतर्गत तृणधान्य भाजीपाला याचे महत्व पटवुन देण्यासाठी जनजागृती मोहीम सुरु करण्यात त्या निमित्ताने तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांनी दिली जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा बेलापुर मराठी मुलांची व मुलींच्या शाळेत तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
त्या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन त्या बोलत होत्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समीतीचे गटविकास अधीकारी सीनारे शिक्षण विस्तार अधीकारी संजीवन दिवे केंद्र प्रमुख अशोक विटनोर अशोक रहाटे संजय बागुल इरफान पठाण शोभा शिंदे मयुरी थावरे आदि मान्यवर उपस्थित होते .या स्पर्धेत तालुक्यातुन एकुण २६ शाळांनी सहभाग घेतला होता बेलापुर ,उक्कलगाव ,पढेगाव ,टाकळीभान ,निमगाव खैरी ,उंदिरगाव वडाळामहादेव ,अशोकनगर या केंद्रातुन प्रत्येकी तिन स्पर्धकांनी सहभाग नोंदविला त्यात प्रथम क्रमांकाचे रुपये पाच हजाराचे बक्षिस एस के सोमय्या श्रीरामपुर शाळेतील योगीता संतोष गोरे यांनी तर द्वितीय क्रमांकाचे रुपये ३५०० चे पारितोषिक भोसलेवाडी येथील विजया भाऊसाहेब गीरमे यांनी मिळविले तर तृतीय क्रमांकाचे रुपये २५०० चे पारितोषिक लजपतरायवाडी येथील शाळेतील कावेरी पोपट साबळे यांनी मिळविले.
या वेळी अशोक विटनोर संजीवन दिवे मास्टर हुडे अजिज शेख आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी सौ सरीता मोकाशी,समीर शेख ,रमेश लगे राजुभाई शेख ,मिनाक्षी दायमा सिकंदर शेख ,राजु सय्यद ,अहमद सय्यद ,ज्योती शेलार ,रवी गायकवाड आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक लतीफ शेख विजया दहीवाळ, शितल गायकवाड, लता परदेशी, शांताबाई गागरे , कल्याणी ढुमणे,अमृता वनारसे ,अंजली देवढे यांनी तसेच शालेय व्यवस्थापन समीतीने विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेखा सोनवणे यांनी केले तर शहाबाई उदमले यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजाबाई कांबळे यांनी केले.
सहयोगी:
पत्रकार देवीदास देसाई - बेलापूर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111*