प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी :-
या रास्ता रोको मुळे तीन ते चार किलोमीटर रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहतूक जाम झाली होती. उस्मानाबाद प्रशासनाने आंदोलना च्या घटना स्थळाची दखल घेतली. व आंदोलकाचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यात येतील असे आश्वासन दिले.यावेळी राज्यातील 165 संस्थाचालक, शिक्षक वृंद व कर्मचारी या आंदोलनात सहभाग झाले होते. संस्थाचालक व कर्मचारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
दोन तासाचा रास्ता रोकोने हजारो वाहने दोन्ही बाजूंनी रस्त्यावर अडकली होती.
बीड जिल्ह्यासह राज्यातील संस्थाचालकांचा या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग होता .
आळणी चौक धाराशिव या ठिकाणी जबरदस्त रास्ता रोको करण्यात आले. महाराष्ट्रातून अतुल दादा मुंडे बीड,नगरे साहेब नांदेड,गोविंद वणवे, निर्मळ सर, वायबसे सर, शेवते मॅडम बीड, कालिदास वीर, केशव आंधळे, बालाजी मेणकुदळे, गायकवाड सर लातूर, शिंदे सर, मगरे सर आदी लोकांनी या आंदोलनात सहभाग घेतला.