अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
अमृत महोत्सवी वर्षात “हरघर तिरंगा” हे अभियान दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत राबविण्यात आले. यादरम्यान नागरिकांनी त्यांच्या घरांसह अनेक ठिकाणी तिरंगा फडकवला. अभियानाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी तिरंगा सन्मानपूर्वक उतरवुन सुरक्षित ठेवणे आवश्यक होते. परंतु आजही अनेक ठिकाणी तिरंगा फडकतांना दिसत आहे. नागरिकांनी तिरंगा ध्वज सन्मानपूर्वक उतरवुन सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111