*हिंगणेवाडी येथे नवरात्र उत्सवासाठी वनी येथून ज्योत
इंदापूर प्रतिनिधि: सप्तशृंगी माता वणी येथून यावर्षी हिंगणेवाडी येथे नवरात्र उत्सवासाठी शिवछत्रपती मित्र मंडळाने ज्योत आणली आहे.दोन रात्री,दोन दिवस ३७० किलोमीटर पायी प्रवास करत हिंगणेवाडीतील अवघ्या तीस युवकांनी ही ज्योत आणली. गावात ज्योत येताच मोठ्या उत्साहात गावकऱ्यांनी ज्योत चे स्वागत केले.नवरात्र उत्सवाचे हे 35 वे वर्षे असून महाराष्ट्रातील तुळजापूर कोल्हापूर सौंदत्ती माहूरगड वनी अशी आदिशक्तीची शक्तीपीठे असलेल्या ठिकाणाहून ज्योत आणण्याची परंपरा आजही कायम आहे या नवरात्र उत्सवामध्ये मुलांसाठी विविध फनी गेम्स, महिलांसाठी दांडिया,भोंडला,नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,होम मिनिस्टर खेळ पैठणीचा,असे विविध कार्यक्रम मंडळाच्या वतीने आयोजित केले जातात. परिसरातील अनेक मान्यवर या नवरात्र उत्सवात हजेरी लावून आरतीचा मान घेतात.*

