प्रा.कुणाल काळे यांच्या विद्यानिकेतन प्रोफेशनल ॲकॅडमी आणि स्कूल ऑफ फाऊंडेशन WCPA तर्फे संयुक्त राष्ट्र संघ USA चे डॉ.ग्लेन मार्टीन यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.
इंदापूर प्रतिनिधि: शुन्यातून विश्व निर्माण करणारे नेहमीच ध्येयाने झपाटलेले असतात असेच एक व्यक्तिमत्व म्हणजेच वडापुरी गावचे सुपुत्र प्रा.कुणाल काळे सर यांच्या विद्यानिकेतन प्रोफेशनल ॲकॅडमी आणि स्कूल ऑफ फाऊंडेशन ला दि.१४ ऑक्टो रोजी WCPA तर्फे संयुक्त राष्ट्र संघ USA चे डॉ.ग्लेन मार्टीन यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.*
२०२१ पासून NEET /JEE/CUET यासारख्या आंतरराष्ट्रीय परीक्षांची तयारी करण्यासाठी,प्रा.कुणाल काळे सर यांच्या कल्पनेतून विद्यानिकेतन प्रोफेशनल ॲकॅडमी आणि स्कूल ऑफ फाऊंडेशन, इंदापूरात साकार झाली.
आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पण *शिस्तीचे आणि संस्कारक्षम* मार्गदर्शन शिक्षण हा वसा घेऊन ॲकॅडमी अग्रेसर आहे.आजपर्यंत अनेक विद्यार्थी विविध प्रकारच्या शासकीय, नावाजलेल्या शैक्षणिक कोर्सेस साठी प्रवेशित झाले आहेत.
ग्रामीण भागात अशा प्रकारे तयारी साठी शैक्षणिक सुविधा देणारी एकमेव ॲकॅडमी म्हणून नावारूपास आली आहे.
या कार्याची दखल घेऊन सदर पुरस्कार प्राप्त झाला आहे.

