प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज तालुक्यातील जाधव जवळा येथील दहा वर्षापासून अंधारात असलेले गणेशनगर प्रकाशमय होणार आहे. केज मतदारसंघाच्याआ. नमिता ताई मुंदडा यांचा प्रयत्नाने विद्यूत पोल उभा करून या भागात प्रकाश पडणार आहे .
या कामासाठी भागातील जनतेने व जाधव जवळा येथील उपसरपंच यांनी जेष्ठ समाजसेवक नंदकिशोरजी मुंदडा यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे हा भाग लवकरच प्रकाशमय होणार आहे आज पोल उभे करण्याचे काम पूर्ण झाले आहे त्यामुळे लवकरच विद्यूत डि.पी बसवण्याचे काम पूर्ण होईल असे सांगितले आहे, या भागात प्रसिद्ध असे गणेश मंदिर तसेच छत्रपती शिवाजी विद्यालय आहे या कामामुळे पाणीप्रश्नाची समस्या सुटणार आहे त्यामुळे जाधव जवळा गणेशनगर भागातील जनतेने आमदार सौ. नमिताताई मुंदडा व जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांचे आभार मानले.

