shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गणेशखिंड वर भास्करगीरीजी महाराज यांची नितांत श्रद्धा व प्रेम- प्रकाशानंदगीरीजी महाराज...

श्रीक्षेत्र गणेशखिंड येथील वरद गजानन उत्सव सोहळ्याची उत्साहात सांगता

चंद्रकांत झुरंगे - भोकर
 श्रीक्षेत्र देवगडचे बाबा शिस्तप्रिय आहेत हे विसरू नका, स्वच्छतेकडून समृद्धीकडे, संस्कारातून संस्कृतीकडे व पावित्र्याकडून भक्ती कडे घेवून जाणारे जीवन म्हणजे देवगडचे बाबाजी होय. आधुनिक युगातील संत, गोभक्त व भक्तीप्रीय असे व्यक्तीमत्व असलेल्या गुरूवर्य भास्करगीरीजी महाराज यांचे श्रीक्षेत्र गणेशखिंड देवस्थान येथे नितांत श्रद्धा व प्रेम आहे. ज्या प्रमाणे शेगावचे गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ, शिर्डीचे साईबाबा त्याप्रमाणे देवगडचे भास्करगीरीजी महाराज हे ही महान संत आहेत असे मत श्रीक्षेत्र देवगडचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगीरीजी महाराज यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान, नवसाला पावणारे जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र गणेशखिंड येथील गणशोत्सवानिमीत्ताने आयोजीत वरद गजानन उत्सव सोहळ्यातील अखंड हरीनाम स्पताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या सांगतेप्रसंगी काल्याचे किर्तनातून उपस्थीत भाविकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी येथील व्यासपिठचालक व श्रीक्षेत्र आंबेजोगाई येथील मुकूंदराज संस्थानचे अध्यक्ष कीसन महाराज पवार, देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब ओझा, सचीव बजरंग दरंदले, येथील विश्वस्त व कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक सचीन गुजर, आमदार लहु कानडे, माजी खासदार भाऊसाहेब वाक्चौरे, अशोक कारखाण्याचे उपाध्यक्ष पुंजाहरी शिंदे, ज्ञानेश्वर मुरकूटे, पंचायत समीतीच्या माजी सभापती सुनिता गायकवाड, अरूणपाटील नाईक, नासिक येथील सोमनाथ महाराज, रविंद्र महाराज गांगुर्डे, संतोष महाराज चौधरी, कृष्णा महाराज वाघुले, संदिप महाराज जाधव, तात्या महाराज शिंदे, परमेश्वर महाराज भारत, किरण महाराज जाधव, लक्ष्मण महाराज नांगरे, काशिनाथ महाराज टेकाळे, बाळासाहेब महाराज जाधव, रंगनाथ महाराज व बालाजी महाराज आदि प्रमुख उपस्थीत होते.
 बाबाजी नेहमी विनोदात्मकतेने सांगतात की मी देव पाहीला नाही पण आम्ही सांगतो बाबाजी आम्ही तुमच्या रूपात देव पाहीला. ज्या ठिकाणी भाव निर्मळ असतो, सेवा निर्मळ असते त्या भक्ताची दखल परमात्मा घेतल्याशिवाय राहत नाही, याच सेवेतून बाबाजींची वर्णी पंढरपूर येथील श्रीक्षेत्र विठ्ठल रूख्मीनी देवस्थानात विश्वस्त मंडळात वर्णी लागली. श्रीक्षेत्र देवगड येथे स्वर्ग व वैकुंठ निर्माण झाले ते केवळ बाबाजींच्या भक्ती व तपश्चर्येतून निर्माण झाले आहे. 
गणशोत्सव हा संपुर्ण हिंदुस्थानात उत्सव म्हणून मोठ्या उत्साहत साजरा केला जातो. आपल्यावर ऋषी, मुनि व संतांचे मोठे उपकार आहेत. केवळ त्यांचेमुळेच भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे. देशाची संस्कृती पुजनीय व वदंनीय आहे ती प्रत्येकाने जपली पाहीजे. देव नेहमी आपला भाव पाहतो तो कधीच भौतिक प्रतिष्ठा पाहत नाही. कधीही भौतिक श्रीमंती पाहत नाही. आपल्या जीवनातील काम, क्रोध, मत्सर व दंभ हे विकार निघुन गेले की त्या भक्तावर देव नेहमी प्रेम करत असतो. असे ही यावेळी प्रकाशानंदगीरीजी महाराज यांनी सांगीतले.
यावेळी प्रकाशानंदगीरीजी महाराज यांनी येथून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र हनुमानगड येथील आठवणींना उजाळा देत अंत:करणातील आठवणी व्यक्त करत या परीसरातील भाविकांचे कृपाशिर्वाद, सर्वांची कृपा, पुर्वजन्मोजन्मीची पुण्याई व बाबाजींच्या कृपाशिर्वादाने हे परम भाग्य लाभले आहे यातूनच श्रीक्षेत्र देवगडच्या तेजस्वी व ओजस्वी परंपरेत मला संधी मिळाल्याचे सांगत असताना त्यांच्या भावना अनावर झाल्याचे दिसले.

मी स्वत: गणेशभक्त आहे. माझ्या आमदारकीच्या माध्यमातून येथे शौचालय व स्वच्छतागृहासाठी निधी दिलेला आहे तो कमी पडत असेल तर आणखी निधी देतो पण येथील भाविकांसाठी अद्यावत व सुसज्ज असे स्वच्छतागृहाची उभारणी करा मी निधी कमी पडू देणार नाही, जास्तीत जास्त निधी घेवून देवस्थानचा विकास करवून घ्या असे आवाहन आमदार लहु कानडे यांनी केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक सचीन गुजर यांनी मनोगत व्यक्त करत श्रीक्षेत्र देवगड व श्रीक्षेत्र गणेशखिंड येथील गुरूवर्य भास्करगीरीजी महाराज यांचे प्रति आपले व भाविकांच्या असलेल्या श्रद्धा, प्रेम व्यक्त करत असलेल्या स्नेहातून व भक्तीतून येथील सोहळा दिवसेंदिवस भव्य व दिव्य होत असल्याचे सांगीतले.

सालाबादप्रमाणे यावर्षीही अनंतचर्तुदशीच्या दिवशी पहाटे भोकर येथील भास्कर फासाटे व कारेगाव येथील चांगदेव पटारे यांनी पायी गोदावरी जल आणले व या गंगाजलाने श्री वरद गजाननाचा जलाभिषेक करण्यात आला. पौराहित्य कारेगाव येथील द्वारकनाथ जोशी यांनी केले.  यावेळी स्वामी प्रकाशानंदगीरीजी महाराज यांची भव्य रिवणुकीने स्वागत करण्यात आले. त्यात पाचेगाव येथील विद्यार्थ्यांचे लेझीम पथक लक्षवेधी ठरले. त्याच बरोबर या मिरवणुकीत टाळ, पक्वाज, भगवे झेंडे, पताका घेवून भाविकांसह परीसरातील महिलांनी पुर्ण मिरवुणक मार्गावर सडा व रांगोळी काढलेली होती. परीसरातील अनेक महिला डोक्यावर तुळशी घेवून स्वामीचं भव्य स्वागत केले. काल्याचे किर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, त्यात आमटी प्रसादाचा संपुर्ण खर्च श्रीरामपूर येथील सुभाष चौधरी यांनी केला. तर न्यू इंग्लीश स्कुल पाचेगाव व येथील व कारेगाव येथील न्यू इंग्लीश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी महाप्रसाद वाढपीची सेवा दिली. यावेळी अशोक कारखाण्याचे वतीने उपाध्यक्ष पुंजाहरी शिंदे यांनी संतपुजन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचीव बजरंग दरंदले व कल्याणराव लकडे यांनी केले.
या सोहळ्यास विश्वस्त मंडळातील कल्याणराव लकडे, राधोजी मोटे, दत्तात्रय पवार, निलेश ओझा, अ‍ॅड.रंगराव गुजर, काशिनाथ गोराणे,  रामभाऊ कवडे, अमोल गुजर, शिवाजी पवार, किरण धुमाळ, दिनकर गायकवाड, मच्छींद्र भालके, नवनाथ बेरड आदिंसह परीसरातील कारेगाव, गुजरवाडी, वांगी, खिर्डी, पाचेगाव, कारवाडी, भोकर, खोकर, टाकळीभान, निपाणीवाडगाव, मालुंजा, भेर्डापूर, मातापूर, पढेगाव आदिंसह परीसरातील मोठ्या भाविक उपस्थीत होते.

नवसाला पावणार्‍या जागरूक देवस्थानात जिल्ह्याबाहेरून ही वर्गणी व देणगीचा वाढता ओघ

येथे येणार्‍या अनेकांनी मोठ्या भक्ती भावाने श्रद्धेच्या व नवसपुर्तीच्या माध्यमातून या सोहळ्यास सढळ हाताने मदत केली त्यात अहमदनगर जिल्ह्यासह धुळे व संभाजीनगर जिल्ह्यातून ही मदत करण्यात आली त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील भाऊसाहेब शहरवाले व धुळे जिल्ह्यातील निवृत्ती उघडे यांनी रोख मदत केली यात कारेगाव येथील मारूती डोळस यांनी २१ हजार, वांगी येथील सचीन राऊत यांनी १५ हजार, छत्रपती संभाजीनगर येथील गणेश बाचकर यांनी ११,१११, खोकर येथील प्रदिप खेडकर यांनी ११ हजार एक, पाचेगाव येथील शंकर मतकर यांनी ११ हजार, टाकळीभान येथील मारूती जगताप यांनी ११ हजार, कारेगाव येथील सचीन शुजूळ यांनी ११ हजार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील भाऊसाहेब शहरवाले यांनी  १० हजार एक, धुळे जिल्हयातील निवृत्ती उघडे यांनी १० हजार, टाकळीभान येथील सुभाष शेळके यांनी ६६६६, कारेगाव येथील प्रसाद तर्‍हाळ यांनी 5हजार एक, गुजरवाडी येथील यमुकर पवार यांनी ५ हजार, कारेगाव येथील ऋतुजा गोरे यांनी ५ हजार, राहुरी तालुक्यातील तिळापूर येथील शिवांश रासकर यांनी ५ हजार, कारेगाव येथील शिवाजी भगत यांनी ५ हजार, गाणेगाव येथील रामकृष्ण आसम यांनी ५ हजार, कारेगाव येथील ज्ञानेश पवार यांनी ५ हजार व टाकळीभान येथील विनायक रासकर यांनी ५ हजार याच बरोबर अशाच प्रकारे अनेक भाविकांनी दिलेल्या देणगी व वर्गणीतून हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
9561174111
close