( वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा ,विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप )
*प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी* :-
युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा,
केज नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष ,विद्यमान नगरसेवक,माऊली विद्यापीठाचे सचिव
पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माऊली विद्यापीठ अंतर्गत विविध शाळा महाविद्यालयात , वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, खाऊ वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला.
संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रताप मोरे नियोजनातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.आदर्श प्राथमिक शाळा केज येथे बक्षीस वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉ हनुमंत सौदागर, शरद गिराम, गंगाधर नेहरकर श्री शिंदे यांच्या हस्ते फळे वाटप व बक्षीस वितरण करण्यात आले.
भाऊसाहेब पाटील अध्यापक विद्यालय, महाविद्यालय प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. प्राथमिक माध्यमिक विद्यालय उमरी येथे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. रामराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात सामान्य स्पर्धा घेऊन बक्षीस वितरण करण्यात आले.सरस्वती कन्या प्रशाळेत सामान्यज्ञान स्पर्धा, व खाऊ वाटप कार्यक्रम घेण्यात आला. राजीव गांधी माध्यमिक विद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धा,धावणे ,उंच उडी स्पर्धा, घेण्यात आल्या.
केज येथील आदर्श प्राथमिक शाळेत सुंदर हस्ताक्षर,रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा घेऊन बक्षीस वितरण करण्यात आले, खाऊ वाटप करण्यात आला. अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला.
मुख्याध्यापक धनराज सोनवणे, डॉ हनुमंत सौदागर, प्राचार्य विजय शिनगारे,मुख्याध्यापिका सविता घुले,मुख्याध्यापक श्री खोसे, मुख्याध्यापक राम कांबळे,सहशिक्षक विलास भिसे ,मुख्याध्यापक संदीप सत्वधर आदींच्या नियोजनातून उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.