shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघात म्हसोबाचीवाडी विद्यालयाची तनवी साळुंके हिची निवड

महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघात म्हसोबाचीवाडी विद्यालयाची तनवी साळुंके हिची निवड 

इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी ता. इंदापूर  येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तनवी लालासो साळुंके हिची महाराष्ट्र च्या  व्हॉलीबॉल संघात निवड झाली. 
पालघर या ठिकाणी संपन्न झालेल्या १७ वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल निवड चाचणी मधून महाराष्ट्र संघात माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी , ता.इंदापूर या शाळेतील विद्यार्थिनी कुमारी तन्वी लालासो साळुंके  हिची निवड झाली आहे . राष्ट्रीय स्पर्धा तामिळनाडू या ठिकाणी होणार आहेत. तन्वीला राष्ट्रीय प्रशिक्षक प्रा.किरण पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.तामिळनाडू येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी संस्थेच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम , सचिव वीरसिंह रणसिंग, खजिनदार हणमंतराव रणसिंग, विश्वस्त कुलदीप हेगडे,वीरबाला पाटील,शिवाजी रणवरे ,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष अंकुश पवार, ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षण समिती अध्यक्ष संदीप पवार आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अजित पाटील ,मुख्याध्यापक प्रमोद भोंग , प्रा लक्ष्मण मेटकरी , शिवाजी जाधव व विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी म्हसोबाचीवाडी ग्रामस्थ यांनी तन्वी चे अभिनंदन केले.
.संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांनी  संस्थेच्या माध्यमिक विद्यालयातील  तन्वी साळुंके हिची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली असल्याचे संस्थेस अभिमान असून विद्यालयातील प्रशिक्षक व विद्यार्थी कौशल्य  तसेच संस्था च्या माध्यमातून विद्यालयास क्रिडा सुविधा उपलब्ध असल्यामुळे विद्यालयाचा नावलौकिक वाढत असल्याचे सांगितले.

फोटो ओळ - कु .तन्वी लालासो साळुंके
close