shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संत तेरेसा गर्ल्स हायस्कूलचा कबड्डी संघ जिल्हा पातळीवर


श्रीरामपूर प्रतिनिधी: 
अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय,श्रीरामपूर क्रीडा समिती व कै.रघुनाथ कृष्णाजी पाटील अवताडे महाविद्यालय माळेवाडी येथे नुकत्याच तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा संपन्न झालेल्या.१४ वर्ष वयोगटातील मुलीच्या कबड्डी स्पर्धात हरेगांव येथील संत तेरेसा गर्ल्स हायस्कूल संघ विजेता ठरला आहे.


या १४ वर्ष वयोगटातील मुलींनी कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत उपांत्य फेरीचे लढतील जे टी एस. बेलापूर तर अंतिम सामन्यात श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी सदर संघ श्रीरामपूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करेल. विजयी संघाचे खेळाडू श्रुती कारले (कर्णधार), शर्वरी बोर्डे, श्रावणी कहार, आर्या कळसाईत, गीतांजली बडाख, गायत्री गायके, पूर्वा बांद्रे, नव्यानी पंडित, अतिथी देहाडे, कार्तिकी गायके, साक्षी बावस्कर, शिफा शेख, अनुष्का देहाडे, समृद्धी कदम, 
विजयी संघाचे संत तेरेसा गर्ल्स हायस्कूलच्या प्राचार्या सिस्टर ज्योती,शाळेचे सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वी संघाला श्रीरामपूरचे क्रीडारत्न नितीन बलराज यांचे मार्गदर्शन लाभले.

*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -9561174111
close