तीन महिन्यांपूर्वी तयार केलेला, निंबोडी- दरेवाडी 2.25 कोटी चा रस्ता पूर्णपणे गायब झाल्याने दुसऱ्यांदा नव्याने तयार करुन देण्याची मागणी....
अहमदनगर (प्रतिनिधी)- निंबोडी ते दरेवाडी या 2.25 कोटी रुपयांच्या निधीच्या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत मागील चार महिन्यांपासून सुरू आहे. यातील एक भाग हा निंबोडी मध्ये जामखेड रोड पासून ते खंडोबा मंदिर (निंबोडी) इथपर्यंत असून त्याचा उर्वरित दुसरा भाग हा मधला आर्मी एरिया सोडल्यानंतर दरेवाडी गावात आहे.
यातील, निंबोडी गावात 650 मीटरचे डांबरीकरण तीन महिन्यांपूर्वी पूर्ण केले होते, तो रस्ता पूर्णपने निघून गेला असल्याच्या निषेधार्थ रस्ता पंधरा दिवसाच्या आत बनवून देण्याच्या मागणीसाठी जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देताना जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत, पप्पु शेठ भाले, शेखर पंचमुख, योगेश भालेराव आदी उपस्थीत होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे हा रस्ता अत्यंत कमी कालावधीतच खराब झाला असून संबंधीत रस्ता पूर्ण केल्यानंतर त्याच्या पुढील 4 वर्षांची देखभाल दुरुस्ती ही आपल्या विभागाकडे आहे. त्यामुळे या नियमानुसार पुढील 4 वर्षात जेवढ्यावेळी हा रस्ता खराब होईल, त्या प्रत्येक वेळेस पुन्हा पुन्हा, आपल्याकडून करून घेतला जाईल.त्यामुळे पुढील सर्व कारवाया टाळायच्या असल्यास आपण आता दुसऱ्यांदा तरी, या रस्त्याच्या कामाकडे पूर्णपणे लक्ष द्यावे.आणि ठेकेदाराकडून रस्ता तांत्रीक दृष्ट्या उत्तम तयार करून घ्यावा, जेणेकरून पुढे देखील आपल्याला रस्ता पुन्हा करण्याचा त्रास होणार नाही.महत्वाचे म्हणजे या ठिकाणी होणाऱ्या जड वाहतुकीचा विचार करून रस्ता काँक्रिट मध्ये तयार करण्यात यावा. जेणेकरून तो व्यवस्थित टिकेल .ही सर्व कार्यवाही येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत करून, रस्त्याचे तांत्रिक दृष्ट्या व्यवस्थित आणि मजबूत काम करून घ्यावे, अन्यथा जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे नियोजनात म्हटले आहे..