shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

2024 चा बारामती लोकसभेचा खासदार भाजपचा असेल - अंकिता पाटील ठाकरे

2024 चा बारामती लोकसभेचा खासदार भाजपचा असेल - अंकिता पाटील ठाकरे 

मिशन बारामतीसाठी आपण सगळ्यांनी सज्ज रहा.
इंदापूर  प्रतिनिधि:
     2024 चा बारामती लोकसभेचा खासदार भाजपचा असेल, मिशन बारामतीसाठी आपण सगळ्यांनी सज्ज रहा, भारतीय जनता पार्टी निवडणुकीसाठी सज्ज आहे, असे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे इंदापूर येथे आयोजित सुपर 100 पदाधिकारी कार्यकर्ते बैठकी प्रसंगी म्हणाल्या.
      पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक लोकोपयोगी असे धाडसी निर्णय घेतले आहेत. परिणामी, आगामी सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत देशात भाजप 300 प्लस जागा जिंकणार असून, बारामती लोकसभा मतदारसंघाचा आगामी खासदार भारतीय जनता पार्टीचा असेल, असा विश्वास पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी व्यक्त केला.    
        महाविजय २०२४ अंतर्गत प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचा बारामती लोकसभा प्रवास होणार आहे. त्याअंतर्गत आज इंदापूर विधानसभा मतदारसंघातील सुपर १०० पदाधिकारी बैठक भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष मा.वासुदेवनाना काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीस उपस्थित राहून जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांनी मार्गदर्शन केले तसेच पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्या समवेत संवाद साधला. यावेळी मंडळातील सर्व आजी माझी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

close