शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
राजकीय बातमी
शिर्डीत प्रशांत वाघचौरे व लक्ष्मण अण्णा कोतकर यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना व रिक्षा संघटना सुरू करण्यात आली. यावेळी परमिट आपे रिक्षाना महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेनेचे स्टिकर लावून शिर्डी पोलीस स्टेशनचे वाहतुक पोलीस निरीक्षक श्री.गुलाबराव पाटील साहेब यांच्या हस्ते रिक्षांना स्टिकर लावून व नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष राजेश लुटे तालुका अध्यक्ष गणेश जाधव ,शिर्डी शहराध्यक्ष लक्ष्मण कोतकर,प्रशांत वाघचौरे मनवीसे शिर्डी शहराध्यक्ष,अभिषेक पोपळघट,चेतन झिंजाड,ऋषी धीवर,गौरव भालेराव,दत्तात्रय खोसे व गणेश चव्हाण इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ऋषी धीवर यांची वाहतूक सेना शिर्डी शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली उपशहराध्यक्ष गौरव भालेराव तसेच उपाध्यक्ष अध्यक्ष दत्तात्रय खोसे यांची निवड करण्यात आली.