गौतमेश्वर माध्यमिक विद्यालय, गोतोंडीच्या प्रथमेश क्षिरसागर याने ८०० मी व १५०० मी धावणे स्पर्धेत मिळवला प्रथम क्रमांक.
इंदापूर प्रतिनिधि: गौतमेश्वर माध्यमिक विद्यालय, गोतोंडी,( ता. इंदापूर, जि. पुणे)
दि. ९ व १० ऑक्टोवर २०२३ रोजी झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत १७ वर्षी खालील गटामध्ये गौतमश्वर माध्य. विद्यालयातील गोतौडी या विद्यालयातील खेळाडू चि. प्रथमेश राजाराम क्षिरसागर याने ८०० मी व १५०० मी धावणे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्या- बद्दल गौतमेश्वर ग्राम-विकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष दिनकर नलवडे, मुख्याध्यापक धनाजी मोरे सर व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी खेळाडू व क्रीडाशिक्षक नानासाहेब नलवडे यांचे अभिनंदन केले. व जिल्हास्तरासाठी शुभेच्छा दिल्या.