shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्राईड अकॅडमी मध्ये विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन बद्दल जनजागृती उपक्रम संपन्न


श्रीरामपूर प्रतिनिधी:
तालुक्यातील भेर्डापूर - वांगी  येथील प्राईड अकॅडमी स्कूल व इनर व्हील रोटरी क्लब,श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यामानाने शाळेतील किशोरवयीन विद्यार्थिनींना सॅनिटरीन नॅपकिन संदर्भात मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा.गोविंद चव्हाण यांनी विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे महत्व विशद केले.

यावेळी बोलताना प्रा.चव्हाण म्हणाले की, भविष्यातील विविध आजार टाळण्यासाठी किशोरवयीन मुलींनी सॅनिटरी नॅपकिन चा उपयोग करावा. आपल्या निष्काळजीपणामुळे विविध कॅन्सर सारखे आजार जडू शकतात. त्यामुळे आपण वेळीच जागरूक राहून सॅनिटरी पॅड चा उपयोग करावा तसेच सॅनिटरी नॅपकिन याचा वापर स्वच्छता व दक्षते संदर्भात मार्गदर्शन प्रात्यक्षिकाद्वारे करण्यात आले.

प्लास्टिकचा वापर टाळावा हेही त्यांनी यावेळी दाखवून दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संस्थापिका,श्रीरामपूर ता.पंचायत समिती माजी सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे, प्राचार्य प्रीती गोटे, ईनर व्हील क्लबच्या सौ.शीतल कुंदे, सचिव श्वेता शहा, नूतन चव्हाण, शितल जायभाये, सूत्रसंचालन विद्या लोखंडे यांनी केले, आभार जुई मेकडे यांनी मानले.

संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close