श्रीरामपूर प्रतिनिधी:
राष्ट्रपिता महात्मा गांधी हे राजकारणातील संत होते महात्मा गांधी मारले तरी मरत नाहीत आणि मरणारही नाहीत असे प्रतिपादन जयंती विभागाचे प्रमुख प्रा. चंद्रकांत कोतकर यांनी केले. तालुक्यातील बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील जयंती विभाग, संशोधन विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्रात ते बोलत होते.
पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, आपला भारत देश हा महात्मा गांधीजींच्या नावाने ओळखला जातो, महात्मा गांधीजींचे आज जगात अनेक पुतळे उभारलेले आहेत, अनेक टपाल तिकिटे काढली आहेत, त्यांचे शेकडो स्मारक आहेत, अनेक विद्यापीठांमधून गांधीजी शिकवले जातात, ब्रिटिशांच्या विरोधात गांधीजींनी संघर्ष केला त्यामुळे गांधीजींबाबत कोणीही गैरसमज करून घेऊ नयेत सत्य अहिंसा असत्य अपरिग्रह सत्याग्रह ही त्यांच्या जीवनाचे सूत्र होते. सायमन गो बॅक असे त्यांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले. रवींद्रनाथ टागोरांनी गांधीजींना महात्मा ही उपाधी दिली तर सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रपिता संबोधले असेही ते म्हणाले. द्वितीय सत्रात प्रा. डॉ.बी.एन पवार यांनी महात्मा गांधीजींची विश्वस्त ही संकल्पना समजून सांगितली. समाजात त्याग, सेवाभाव, सहकार्य, प्रेम ,समर्पण आणि आत्मविश्वास युक्त माणसे असायला हवी .निस्वार्थ वृत्तीचा प्रवास स्वार्थाचा विचार नाही अशी माणसे समाजात असायला हवीत .समाजात आपल्याला जे काही मिळाले आहे, आपल्याकडे असलेली संपत्ती, धनदौलत म्हणून जे काही आहे त्यात सर्वात समाजाचा वाटा आहे असेही ते म्हणाले, तर तिसऱ्या सत्रामध्ये अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे म्हणाल्या की, राष्ट्रपिता महात्मा गांधी हे विवेकाचे दुसरे नाव आहे. टिळक युगाचा अस्त झाला. गांधीयुगाला सुरुवात झाली. गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळ बहुजनांसाठी व्यापक बनवली. दुसरे महायुद्ध झाले आणि भारताला स्वातंत्र्य देणे ब्रिटिशांना अपरिहार्य ठरले तेव्हा देशाची सत्ता आपल्याकडे यावी असे द्विराष्ट्रवाद्यांना अपेक्षित होते तसे झाले नाही देश काँग्रेसच्या स्वाधीन केला गेला हे खऱ्या अर्थाने गांधी द्वेषाचे कारण आहे असेही त्या म्हणाल्या. प्रश्नोत्तरातून चर्चासत्र अधिक यशस्वी झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संशोधन विभागाचे डॉ.विठ्ठल सदाफुले यांनी केले तर प्रा.प्रकाश देशपांडे यांनी आभार मानले.या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी सेवक वृंद यांनी परिश्रम घेतले.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
9561174111

