shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची सुरुवात स्वतः पासून करावी- सौ.मंजुश्रीताई मुरकुटे

विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची सुरुवात स्वतः पासून करावी- सौ.मंजुश्रीताई मुरकुटे

श्रीरामपूर प्रतिनिधी:
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित 'स्वच्छता हीच सेवा' या भारत सरकारच्या मोहीमेअंतर्गत श्रमदानाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. अशोक सह.साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदासजी मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले अशोक आयडियल स्कूल, प्रगतीनगर (सी.बी.एस.ई.) च्या विद्यार्थ्यांद्वारे स्वच्छता उपक्रम तालुक्यातील कारेगाव या ठिकाणी अशोक कारखान्याच्या संचालिका व अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 


याप्रसंगी सौ.मुरकुटे यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून देत विद्यार्थ्यांना स्वतः पासून स्वच्छता आचरणात आणण्यासाठी मार्गदर्शन केले. स्वच्छता अभियान मोहीम राष्ट्रीय पातळीवर का व कशी राबवली जाते, तसेच अशोक शैक्षणिक संकुल हे स्वच्छतेबद्दल नेहमीच जागरूक असते, असे स्पष्ट केले. अध्यक्षस्थानी अशोक कारखान्याचे संचालक भाऊसाहेब उंडे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत माणसाने जीवनात स्वच्छता कशी ठेवावी, याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.


         अशोक कारखान्याचे माजी संचालक रामदास पटारे यांनी ग्रामस्थांतून मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थ्यांच्या भाषणाचे कौतुक केले. आपण नेहमी आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे स्वच्छता अभियानानिमित्ताने सर्वांना आवाहन केले. या कार्यक्रमानिमित्त कु.श्रेया कासार, कु.श्रुष्टी उंडे, कु.दिशा आरोटे या विद्यार्थिनींची भाषणे झाली. स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. हनुमान मंदिर परिसर, बाजारतळ परिसर, कारेश्वर मंदिर परिसर, सैनिक स्मारक परिसर विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदात आणि उत्फुर्तपणे स्वच्छ केला. या कार्यासाठी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 
           अशोक आयडियल स्कूलचे प्राचार्य रईस शेख यांनी आपल्या प्रस्ताविकपर भाषणामध्ये महात्मा गांधी स्वच्छता अभियान आपल्या आरोग्याशी कसे संबंधित आहे, याविषयी माहिती दिली. स्कूलतर्फे मंचावर उपस्थित सर्व ग्रामस्थांचा सत्कार संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आला. या निमित्ताने ग्रामस्थांतर्फे विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून बिस्किटाचे वाटप करण्यात आले. अशोक आयडियल स्कूल तर्फे अशाप्रकारे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाचा कारेगावकरांनी भरभरून कौतुक केले. 
          या स्वच्छता मोहिमेसाठी प्रामुख्याने अशोक कारखान्याचे संचालक भाऊसाहेब उंडे, कारेगाव भागचे संचालक डी.आर. पटारे, अशोक कामगार पतपेढीचे संचालक संदीप डोळस, अशोक कारखान्याचे माजी संचालक रामदास पटारे, कारेगावचे सरपंच आनंद वाघ, उपसरपंच विजय पटारे, कामगार तलाठी चितळकर, विष्णुपंत लवांडे, भागवतराव उंडे, डॉ.मंगेश उंडे, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर उंडे, भाऊसाहेब कहांडळ, नंदकिशोर पटारे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युसुफ सय्यद यांनी केले व आभार सुनील बागुल यांनी मानले.
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
close