shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा ग्रंथालयात वैयक्तिक* *सभासद होण्याचे आवाहन


 अहमदनगर जिमाका वृत्तसेवा: अहमदनगर येथील बालिकाश्रम रोड याठिकाणी कार्यरत असलेल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात विविध विषयांवरील २७ हजार एवढी ग्रंथसंपदा उपलब्ध आहे.  प्रत्येकाने वाचनाची सवय अंगिकारुन समृद्ध होण्यासाठी ग्रंथालयाचे वैयक्तिक सभासद होण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी, अहमदनगर यांनी केले आहे.


ग्रंथालयामध्ये वैयक्तिक सभासद होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज व ५०० रुपये अनामत रक्कम, दि्ववार्षिक प्रवेश शुल्क १०० रुपये व अर्ज शुल्क १० रुपये असे एकुण ६१० रुपये भरुन नोंदणी करता येईल. सभासद म्हणून नोंदणी केल्यानंतर शासकीय सुट्टया वगळता सकाळी १०.३० ते सायं. ५.३० या वेळेत ग्रंथांची देवाण-घेवाण करता येऊ शकेल.
ग्रंथालयामध्ये वैयक्तिक सभासद म्हणून नोंदणीसाठी वअधिक माहितीसाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, बालिकाश्रमरोड, महालम्क्षी उद्यान, पंपिंग स्टेशनरोड, अहमदनगर येथे संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close