shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अन्याय अत्याचार निर्मूलन समिती पदाधिकारी यांच्याकडून निफाड उपजिल्हा रुग्णालयाची पहाणी - वैद्यकीय अधीक्षकांशी चर्चा


औषधांचा साठा पुरेसा,बाहेरुन औषधे आणण्याची आवश्यकता नाही - वैद्यकीय अधीक्षक डॉ.तांबडे

निफाड प्रतिनिधी:
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाचा कळस असुन औषधांची कमतरता, डॉक्टरांचा निष्काळजीपणा, डॉक्टरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे एका गरोदर महिलेची प्रसूती लांबवण्यात आली, ज्याची किंमत तिला आणि तिच्या बाळाला जीव देऊन चुकवावी लागली.

या प्रकरणामुळे निफाड तालुका अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे नेतृत्वाखाली निफाड उपजिल्हा रुग्णालयास अचानक भेट देऊन औषधांचा साठा, रुग्णवार्ड,अतिदक्षता विभाग व स्वच्छतागृहांची पहाणी करून वैद्यकीय अधीक्षक डाॅ.तांभाळे यांची भेट घेऊन वयाचे दाखले, डीलेव्हरी पेशंट व सिझर संदर्भात चर्चा करण्यात आली. 

औषधांचा साठा पुरेसा असुन रुग्णालयातील स्वच्छतागृह व्यवस्थित आढळल्याने समितीचे अध्यक्ष यांनी समाधान व्यक्त करुन डाॅक्टर व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. शिष्टमंडळात सर्वश्री जिल्हाध्यक्ष संजयबाबा गायकवाड, सुरेशभाई डांगळे, नितीनकाका खडताळे, प्रमोद शिंदे, विकास जगताप, उदय गांगुर्डे, अर्चनाताई दरगुडे, मनिषा चतुर, प्रमोद आहीरे, आदी.मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना  योग्य ते सहकार्य करुन मोफत उपचार करण्यात येतील तसेच कुठल्याही प्रकारचे औषधे बाहेरून मागितले जाणार नाही अशी ग्वाही वैद्यकीय अधीक्षक डाॅ.तांभाळे यांच्याकडून शिष्टमंडळास देण्यात आली.


सहयोगी:
पत्रकार दीपक कदम - श्रीरामपूर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर- 9561174111
close