shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये राज्यस्तरीय भव्य आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा संपन्न.

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये  राज्यस्तरीय भव्य आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा संपन्न.

 संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले मॅडम यांच्या अभिष्टचिंतन निमित्त हर्बल गार्डनची लागवड .
इंदापूर प्रतिनिधि:जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी या  संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले मॅडम यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त JBVP चषक राज्यस्तरीय भव्य  वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.हे या  स्पर्धेचे  दुसरे वर्ष असून यावर्षी ०५ आँक्टोंबर २०२३ रोजी ही स्पर्धा इंदापूर तालुक्यातील  जय भवानीगड विकास प्रतिष्ठान येथे पार पडली. याकरिता विद्यार्थ्यांनी पूर्व नाव नोंदणी करून स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला.
 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळवा,  एक चांगला वक्ता बनवा ,त्यांचे भविष्य उज्वल घडावे व आदर्श पिढी निर्माण व्हावी  तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या विविध कौशल्याचा विकास साधण्यासाठी राज्यस्तरीय भव्य आंतरशालेय वक्तृत्व  स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये बीड, सातारा ,सांगली, पुणे, आंबेगाव, बारामती, पनदरे ,भवानीनगर ,गोखळी ,अकलूज, वालचंदनगर येथील विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभागी होऊन गतवर्षी प्रमाणे याही वर्षी उत्तम प्रतिसाद दिला.
यामध्ये स्पर्धेचे एकूण तीन गट तयार करण्यात आले होते.
लहान गटमध्ये  39 स्पर्धक   , मध्यम गटामध्ये 47स्पर्धक  ,मोठ्या गटामध्ये 49 स्पर्धक सहभागी झाले होते .  स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी परीक्षक म्हणून निर्मळ सर, आवळे सर,तेरखेडकर सर, साळुंखे सर, जगताप सर लाभले . त्यांनी अत्यंत पारदर्शकपणे व नि:पक्षपातीपणे परीक्षण केले. तसेच चित्रलेखा ढोले मॅडम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी च्या प्रांगणात  विद्यार्थ्यांनी हर्बल गार्डन  औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली.  प्रागैतिहासिक काळापासून पारंपारिक औषध निर्मितीमध्ये या वनस्पती शोधल्या आणि वापरल्या गेल्या आहेत. त्या मनुष्याला कशाप्रकारे उपयुक्त आहे व विद्यार्थ्यांना त्याचे सखोल ज्ञान होण्यासाठी यामध्ये सदाफुली, इन्सुलिन प्लांट, रुद्राक्ष, बेहेडा, अर्जुन, पिवळी हळद ,काळी हळद ,शतावरी ,ब्राह्मणी ,कांडवेल, कृष्णकमळ, गुळवेल, कडूलिंब, कढीपत्ता, ओवा अशा विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींची म्हणजेच हर्बल गार्डनची लागवड या ठिकाणी करण्यात आली ;व त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ढोले सरांनी केले.
विद्यार्थ्यांनी रोज आपल्या जीवनामध्ये एक तरी पुस्तक वाचावे जसे की 'वाचाल तर वाचाल' या उक्तीप्रमाणेच आपल्या  विचारांमध्ये वाढ करावी  व एक चांगला व्यक्ती चांगला वक्ता व चांगला आदर्श विद्यार्थी घडावा असे चित्रलेखा मॅडम यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.
स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे 
लहान गट -
 पहिला क्रमांक- कु दुर्वा अमरदीप गवळी प्राथमिक विद्यामंदिर  पणदरे १००१रु, चषक व प्रमाणपत्र
दुसरा क्रमांक- कु.शर्वरी संजय चौधर विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश स्कूल बारामती इयत्ता चौथी ७०१ रु, चषक व प्रमाणपत्र ,
तिसरा क्रमांक- जोया उमरफारुख पठाण वालचंद नगर पाठशाळा क्रमांक तीन ५०१ रु,चषक व प्रमाणपत्र ,
उत्तेजनार्थ विभागून१. हर्षल शहाजी पालवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सदाशिवनगर इयत्ता दुसरी- ३०१ रु ,चषक व प्रमाणपत्र 
उत्तेजनार्थ विभागून२. यशोधरा अमर चंदनशिवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोखळी इयत्ता चौथी-३०१रु ,चषक व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ विभागून 3. श्लोक विनायक देवकाते विद्या प्रतिष्ठान मराठी प्राथमिक शाळा इयत्ता चौथी
मध्यम गट 
 पहिला क्रमांक-  1.तनिष्का गणेश जाधव देशमुख प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी इयत्ता सातवी३००१रु, चषक 
दुसरा क्रमांक- साक्षी संजय जगताप नवमहाराष्ट्र विद्यालय पणदरे इयत्ता पाचवी २००१ रु, चषक व प्रमाणपत्र ,
तिसरा क्रमांक- अथर्व गोरख शिर्के नवमहाराष्ट्र विद्यालय अंधारे इयत्ता पाचवी १००१ रु, चषक व प्रमाणपत्र ,
उत्तेजनार्थ - तनवीर रवींद्र दवणे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल कोरटी इयत्ता सातवी ५०१ रु ,चषक व प्रमाणपत्र 
 उत्तेजनार्थ - वैभव अरुण कोकरे, त्रिमूर्ती विद्यालय टाकळी इयत्ता सहावी ५०१ रु ,चषक व प्रमाणपत्र 
मोठा गट - 
पहिला क्रमांक- संतोष भीमराव राजगुडे न्यू इंग्लिश स्कूल इयत्ता12वी ५००१रु, चषक व प्रमाणपत्र
दुसरा क्रमांक-श्रावणी अशोक कचरे  प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल इयत्ता नववी ३००१ रु, चषक व प्रमाणपत्र ,
तिसरा क्रमांक- महादेव बाळासाहेब मिसाळ लोकविकास जुनिअर कॉलेज वेळापूर इयत्ता बारावी २००१ रु, चषक व प्रमाणपत्र ,
उत्तेजनार्थ - सिद्धी संतोष निंबाळकर श्री छत्रपती हायस्कूल व जुनियर कॉलेज भवानीनगर इयत्ता बारावी ५०१ रु ,चषक व प्रमाणपत्र 
 उत्तेजनार्थ - हर्षदा उमेश शेरकर ची छत्रपती हायस्कूल व जुनिअर कॉलेज भवानीनगर इयत्ता बारावी ५०१ रु ,चषक व प्रमाणपत्र देऊन विजेत्या स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी  विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धिंगनासाठी नेहमीच प्रेरणा देणारे  जय भवानीगड विकास प्रतिष्ठान ,लाखेवाडी संस्थेचे अध्यक्ष तथा मा.सदस्य जि.प.पुणे श्रीमंत ढोले सर,संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले मॅडम,प्रमुख सल्लागार प्रदीप गुरव सर संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे सर ,संस्थेचे जनसंपर्क अधिकारी गणेश पवार सर,संस्थेचे मुख्याध्यापक राजेंद्र सरगर सर,फार्मसी कॉलेजचे प्राचार्य . डॉ.सम्राट खेडकर सर ,सर्व विभागाचे सुपरवायझर ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.शिक्षक मनोगत लता कचरे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमंत गुरव  व दीपक वडापुरे  यांनी केले.
close