अकोले:-
अकोले तालुकास्तरीय मैदानी पावसाळी क्रीडा स्पर्धा मध्ये कळसेश्वर विद्यालय कळस बु च्या 17 वर्ष मुली नी यश मिळवले आहे.
आय टी आय मैदान अकोले या ठिकाणी तालुकास्तरीय मैदानी पावसाळी क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीच्या कळसेश्वर विद्यालय कळस बु मधील 17 वर्ष मुली वयोगटामध्ये 1500 मी धावणे मध्ये प्राची वाकचौरे प्रथम, उंच उडी सायली वाकचौरे तिसरी, रिले 4x400 मध्ये सायली वाकचौरे, प्राची वाकचौरे, साक्षी वाकचौरे, स्वाती रनशूर प्रथम, रिले 4x100 सायली वाकचौरे, प्राची वाकचौरे, साक्षी वाकचौरे, स्वाती रनशूर तिसरा, भाला फेक प्राची वाकचौरे दुसरी व मोनाली वाकचौरे तिसरी, उंच उडी प्रकारात सायली वाकचौरे तिसरी, लांब उडी प्रकारात साक्षी वाकचौरे दुसरी असे यश मिळवले आहे.
सर्व विद्यार्थीनीची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. त्यांना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनिता शेलार, क्रीडा शिक्षक शिवाजी आवारी,मच्छिंद्र साळुंके,कुमार पालवे , सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच यशस्वी विद्यार्थीनीचे संस्थेच्या सेक्रेटरी दुर्गाबाई नाईकवाडी, संस्थेच्या अध्यक्षा शैलजा पोखरकर ,कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी,सतिष नाईकवाडी,संदिप नाईकवाडी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.