मोर्शीत सक्रीय क्षयरुग्न शोधमोहीम
मोर्शी - उपजिल्हा रुग्णालय मोर्शी अंतर्गत शहरात सक्रीय क्षयरुग्ण शोधमोहीम गिट्टीखदान, गंधेघाटपुरा, आंबेडकर नगर, खोलवाटपुरा येथे ही मोहीम 3 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर पर्यंत असून या मोहिमअंतर्गत बाह्यरुग्णाची थुंकी नमुने व क्ष-किरण काढण्यात येत आहे. तसेच क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यात येत आहे.
सक्रीय क्षयरुग्ण मोहीम उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रमोद पोतदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. अमरावती जिल्हा पर्यवेक्षक श्री.कैलास शिंदे व उपजिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री.हरीश निंभोरकर, आशिष पाटील, हितेश सोळंके, स्वाती बुरंगे व आरोग्य कर्मचारी श्री.विनय शेलुरे,रितेश पुंड,अमोल झाडे,विकार अहमद,प्रशांत बेहरे,विनोद पवार,प्रकाश मंगळे,नंदू थोरात,रितेश कुकडे व श्रीराम नर्सिंग कॉलेज येथील विद्यार्थिनी व हेमा शहाणे या सहभागी आहेत. या मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी डेंग्यू सर्वेक्षण व किटकजन्य आजाराविषयी सुद्धा जनजागृती करण्यात आली..