shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

१५ ऑक्टोबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन**इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन


अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अहमदनगर, शासकीय तंत्रनिकेतन अहमदनगर, जेआयटीओ जॉब्स, अहमदनगर, ईक्विटास आणि सर्व रोटरी क्लब अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने  रविवार दि. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता शासकिय तंत्रनिकेतन, बुरुडगांव रोड, अहमदनगर येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पुर्ण करून रोजगाराच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

या रोजगार मेळाव्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील ३० ते ३५ नामांकित कंपन्यांचे उद्योजक सहभागी होऊन प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे उमेदवरांची निवड करणार आहेत.  एसएससी,  एचएचसी, सर्व शाखेतील पदवीधर (बीए,बी कॉम,  बी एससी,इंजिनिअरींग, कृषी,फार्मासिटीकल), आयटीआय (सर्व ट्रेड) व वैद्यकिय (नर्सिंग) इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, कंप्युटर इ. क्षेत्रामध्ये डिप्लोमा, डिग्री झालेल्या उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर तसेच https://forms.gle/9jY1gYFqWPZC2BBr6 या लिंकवर आपली नाव नोंदणी करून पात्रतेनुसार उद्योजकांकडे अप्लाय करावे.    
याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्र. ०२४१- २९९५७३५ किंवा रोजगार मेळावा समन्वयक  वसीमखान पठाण मो. नं. ९४०९५५५४६५ मच्छिंद्र उकिरडे मो. नं. ९५९५७२२४२४,संतोष वाघ मो. नं. ८८३०२१३९७६ बद्रिनाथ आव्हाड मो. नं. ९४२०७२५२८०, योगेश झांजे मो. नं. ९५८८४०८८९०, आकाश बोठे मो. नं. ९६९९८६५०४०, व  सुशिल नलवडे मो. नं. ९३०७३२२९१९ यांच्याशी संपर्क साधावा असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.


*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close