shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पण चांगल्या कामाचा उल्लेख व गौरवोद्गार काढले पाहीजे - पुंजाहरी शिंदे



भोकर सोसायटीची वार्षीक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

चंद्रकांत झुरंगे -भोकर
भोकर विविध कार्यकारी सोसायटी हि सभासदांना चांगली सेवा देणारी सर्वोत्तम सोसायटी आहे. चांगल्या कामांचा उल्लेख व गौरवोद्गार काढले गेले पाहीजे. काम करत असताना न कळत चुका होत असतात. सभासदांनी त्रुटी दाखविल्याच पाहीजे व संचालक मंडळाने त्या दुरूस्त केल्या पाहीजे. यापुढे खर्च तपशिलासह मांडला जाईल. विद्यमान संचालक मंडळाचा कारभार चांगला आहे. यात आणखी दुरूस्ती व काटकसरीचा कारभार करावा असे आवाहन अशोक कारखाण्याचे उपाध्यक्ष पुंजाहरी शिंदे यांनी केले. भोकर सोसायटीची वार्षीक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली.


श्रीरामपूर तालुक्यातील भोकर विविध कार्यकारी सोसायटीच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत उपस्थीतांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गणेश छल्लारे हे होते. यावेळी अशोकचे उपाध्यक्ष पुंजाहरी शिंदे, जेष्ठ सभासद आण्णासाहेब चौधरी, एकनाथ लोखंडे, बाळासाहेब विधाटे, रामदास शिंदे, माजी उपसरपंच महेश पटारे, भागवतराव पटारे, दत्तात्रय पटारे, कारभारी तागड, भाऊराव सुडके, राहुल अभंग, सागर शिंदे, पंढरीनाथ मते, आण्णासाहेब काळे व सुर्यभान शेळके आदि प्रमुख उपस्थीत होते. 


सध्या सर्वत्र शेतकर्‍यांना ऊसाच्या पिकाला हुमनीचा त्रास वाढला आहे त्यासाठी अशोक कारखाण्याचे वतीने अल्प मोबदल्यात औषध उपलब्ध केलेले आहे त्याचा जास्तीत जास्त ऊस उत्पादकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी शिंदे यांनी केले. भोकर सोसायटी आतापर्यंत गेल्या अनेक वर्षापासून तोट्यात आहे. आम्ही शक्य तीतक्या काटकसरीचा कारभार करून नफा मिळवत संचीत तोटा कमी केला. विद्यमान संचालक मंडळाने केलेल्या वसुलास सभासदांनी साथ दिल्याने या वर्षात सोसायटीला 11 लाखाचा नफा मिळाल्याने संचीत तोट्यात घट झाली आहे. हि संस्था नेहमीच तोट्यात राहील्याने सभासदांना लाभांश मिळणे बंद झाले होते त्यावर मात करून या वर्षी दिवाळीत सभासदांना लाभांश देणार असल्याचे बी आर एसचे युवा तालुकाध्यक्ष व सोसायटीचे अध्यक्ष गणेश छल्लारे यांनी सांगीतले.

अशोक सहकारी साखर कारखाण्याने ह्युमणी लागण झालेले ऊस तोडीस प्राधान्य देवून असे ऊस अगोदर तोडून न्यावेत म्हणजे शेतकर्‍यांचे नुकसान टळेल तसेच संस्थेने आवश्यक तेव्हढा खर्च करावा प्रगती करायची असेल तर खर्च होणारच आहे पण काटकसरीने कारभार करत सभासदांना तपशिलासह खर्च सादर करण्याची मागणी माजी अध्यक्ष सागर शिंदे यांनी केली. सहकारी सोसायटी हि शेतकर्‍यांसाठी विकासाचा कणा आहे तर संस्थेचा सचीव हा विकासाचा व संस्थेचा दुवा असतो.तीला जपले पाहीजे. गेल्या दोन वर्षापासून पंजाबराव देशमुख कर्ज व्याजाची रक्कम मिळाली नाही त्यासाठी प्रयत्न करावे. येथे कारभार करणारे बदलत राहतील पण संस्था टिकल्या तरच शेतकरी टिकणार आहे. संचालक मंडळाने थकीत कर्ज वसुलीसाठी प्रयत्न करावे. तसेच सध्या दुष्काळी परीस्थीती असल्याने  सरकारने शेतकर्‍यांचे कर्ज माफ करावे. शासनाने सोसायटींना 151 प्रकारच्या व्यावसायासाठी परवाणगी दिली आहे त्यादृष्टीने विचार करावा अशी सुचना काँग्रेस सेवादलाचे तालुकाध्यक्ष सुदाम पटारे यांनी केली.
भोकर सोसायटीत केवळ दोन मोठे कर्जदार थकबाकीत गेल्याने संस्था तोट्यात दिसत आहे पण आम्ही त्या दोन सभासदांसाठी 1364 सभासदांचे नुकसान होवू देणार नाही. या सभासदांना लाभांष देणारच आहोत तसेच संस्थेचे उत्पादन वाढविण्यासाठी सोसायटीच्या जागेत लवकर नवीन इमारतीची उभारणी करून त्यात अद्यावत कार्यालय, शॉपींग कॉम्पलेक्स उभारून उत्पन्न वाढविण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशिल असल्याचे संचालक महेश पटारे यांनी सांगीतले. 

त्या दोन थकबाकीदार शेतकर्‍यांना व्याजात सुट देवून एकरकमी वसुल करण्याची मागणी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष भाऊराव सुडके यांनी केली. संस्थेने काटकसरीने कारभार करत सभासदांचे हित जोपसण्याठी सहकार्य करावे असे आवाहन भाजपाचे तालुका संघटक सतीष शेळके यांनी केली. यावेळी ऐन वेळेच्या विषयात सुर्यभान शेळके, बाळासाहेब विधाटे, संजय पटारे, वाल्मीक जाधव, सुरेश अमोलीक, नामदेव तागड आदिंसह अनेकांनी चर्चेत सहभाग नोंदविला.
यावेळी सागर शिंदे, संजय पटारे, बाबासाहेब तागड, सुरेश अमोलीक, बाबासाहेब बेरड, ठकसेन खंडागळे, नामदेव तागड, दत्तात्रय पटारे, आण्णासाहेब काळे, सुकदेव वाकडे, भाऊसाहेब लोखंडे, किशोर मते, राजेंद्र चौधरी, भागवतराव अभंग, पप्पू थोरात, बापूसाहेब खेडकर, मेहबुब पठाण, वाल्मीक जाधव, कचरू वाकडे, बाळासाहेब चौधरी, बाळासाहेब पटारे, निलेश झिने, सुनिल विधाटे, संजय डूकरे, आण्णासाहेब शेळके, विजय झिने, सोपान कोल्हे, भारत छल्लारे, याकोब अमोलीक, शंकर गाढे, बाबासाहेब मते, गणेश विधाटे, अशोक खेडकर, राजेंद्र राहींज, व्यावस्थापक सिताराम कर्जूले, अरविंद धनेश्वर, गोरख आबुज व सौरभ कर्जूले आदिंसह मोठ्या संख्येने सभासद उपस्थीत होते.
सोसायटीचे व्यावस्थापक सिताराम कर्जूले यांनी अहवाल वाचन केले शेवटी सोसायटीचे अध्यक्ष गणेश छल्लारे यांनी आभार मानले.

संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close