shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तृतीयपंथीयांसाठी हेल्पलाईन क्रमांक सुरु


अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
 तृतीयपंथीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे व त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत तृतीयपंथीयांसाठी ०२४१ – २३२९३७८ हा हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आला असुन याचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त, राधाकिसन देवढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले. आहे.
तृतीयपंथीयांना संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना तसेच शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ देणेबाबत कार्यवाही व त्याबाबतच्या अडचणी सोडविणे शिधापत्रिका. मतदान कार्ड व आधारकार्ड काढणेकामी मदत करणे. तसेच केंद्रशासनाच्या पोर्टलवर नोंदणी करुन जिल्हाधिकारी यांचेमार्फत तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्र प्रदान करणे आदी योजना तृतीयपंथीयांसाठी लागु आहेत. तीयपंथीयांच्या समस्या व तक्रारीचे निवारण करण्यासाठी तसेच तृतीयपंथीयासाठी शासनामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती देणे, महाविदयालयांशी संपर्क करुन तृतीयपंथीय विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी हा हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आला आहे.


जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांनी (transgender.dosje.gov.in) या पोर्टलवर नोंदणी करुन तृतीयपंथी असल्याबाबत प्रमाणपत्र व ओळखपत्र प्राप्त करुन घ्यावे. शासनामार्फत राबविण्यात येणा-या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close