जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन...!
अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत सन २०२३ - २४ या वर्षात फळबागांचे पुनरुज्जीवन योजना राबविण्यात येत आहे. जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन घटकाखाली अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
राज्यातील जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या घटकामध्ये फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी ४० हजार रुपये प्रति हेक्टर प्रकल्प किंमत ग्राह्य धरुन त्याच्या ५० टक्क्याप्रमाणे जास्तीत जास्त २० हजार रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे अनुदान देय आहे. यामध्ये कमीत-कमी ०.२० हेक्टर व कमाल २ हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान देय आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111