shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सौ.मंदाकिनी खाजेकर / ब्राम्हणे, उपक्रमशील गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

श्रीरामपूर प्रतिनिधी:
खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या खोकर येथील गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापिका सौ. मंदाकिनी विकास खाजेकर / ब्राम्हणे यांना उपक्रमशील गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार अहमदनगर येथे राज्याचे शिक्षण संचालक संपतराव सुर्यवंशी व शिक्षण उपसंचालक राजेंद्र आहिरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग अहमदनगर व जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. यापुर्वीही त्यांना महात्मा गांधी मिशन ज्ञान प्रसार बीड यांच्या वतीने आचार्य मुख्याध्यापक पुरस्कार, ओमसाई ग्राम प्रतिष्ठाण डोबिंवली यांच्या वतीने कृतीशील मुख्याध्यापक पुरस्कार, अथर्व ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धे मध्ये कलाभूषण मुख्याध्यापक पुरस्कार तसेच अहमदनगर जिल्हा गणित अध्यापन मंडळ यांच्या वतीने रामानुजन पुरस्कार तसेच कला प्रेम आर्ट मयुरा मुख्याध्यापक असे विविध पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल श्रीरामपुर न.पा.मा.नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, संस्था चेअरमन पुष्पलता  गोविंदराव आदिक (नानी) , संस्था अध्यक्ष डॉ. बबनराव आदिक, सचिव अविनाश गोविंदराव आदिक, सहसचिव ॲड. जयंत चौधरी, तसेच शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष व कौन्सिल सदस्य हंसराज पा. आदिक,नितीन पवार, सुनिल थोरात आदिंनी अभिनंदन केले आहे .
अहमदनगर जिल्हा मुख्याधापक संघाचे अध्यक्ष सुनिल पंडीत सर, सर्व पदाधिकारी तसेच श्रीरामपुर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जाकीर सय्यद सर,सचिव सुनिल म्हसे सर,सर्व पदाधिकारी , जिल्ह्यातील मुख्याध्यापक या पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी उपस्थित होते.

सौ मंदाकिनी ब्राम्हणे / खाजेकर या सेवानिवृत्त मुख्याध्यापक विकास खाजेकर यांच्या सौभाग्यवती तर नवस्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते ॲड. विजयराव खाजेकर यांच्या भावजयी तथा प्रवरा सहकारी बॅकेचे शाखाधिकारी सुभाष ब्राम्हणे यांच्या त्या भगिनी आहेत.त्यांना मिळालेल्या जिल्हास्तरीय या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close