shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी म्हसोबाचीवाडी विद्यालयाची तनवी साळुंके हिची निवड

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी म्हसोबाचीवाडी विद्यालयाची तनवी साळुंके हिची निवड 

इंदापूर प्रतिनिधि:इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी ता. इंदापूर  येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तनवी लालासो साळुंके हिची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत निवड झाली. 
म्हसोबाचीवाडी विद्यालयाने इंदापूर येथील तालुकास्तरीय व बारामती येथील जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होत प्रथम क्रमांक मिळवला होता. जिल्हा क्रीडा अधिकारी ,क्रिडा संचालनालय अहमदनगर यांच्या  वतीने विभागीय  १७  वर्षीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन नेवासा जिल्हा अहमदनगर येथे  स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेत १७ वर्षीय वयोगटातील मुले व मुली यांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.यामध्ये १७ वर्षे वयोगटात माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी  विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी तनवी लालासो साळुंके हिची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे. पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत ती सहभागी होणार आहे .माध्यमिक विद्यालय मसोबाचीवाडी विद्यालतातील तनवी लालासो साळुंके हिची राज्यस्तरीय हॉलीबॉल संघात निवड झाल्याबद्दल परिसरात अभिनंदन होत आहे. तनवी साळुंके हिला प्रशिक्षक किरण पवार, मुख्याध्यापक प्रमोद भोंग यांचे मार्गदर्शन लाभले.संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांनी  संस्थेच्या माध्यमिक विद्यालयातील राज्यस्तरीय स्पर्धेत निवडले जात असल्याचे संस्थेस अभिमान  होत असल्याचे सांगितले.तनवी साळुंके हिचे  संस्थेच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम सचिव वीरसिंह रणसिंग, खजिनदार हणमंतराव रणसिंग, विश्वस्त कुलदीप हेगडे,वीरबाला पाटील,शिवाजी रणवरे यांनी अभिनंदन केले.
close