*श्री वर्धमान विद्यालयास राज्यस्तरीय "महाराष्ट्र समाज गौरव पुरस्कार" प्राप्त*
इंदापूर प्रतिनिधि:वालचंदनगर (दि.03) इंडियन टॅलेंट सर्च या संस्थेमार्फत दिला जाणारा 'महाराष्ट्र समाज गौरव पुरस्कार' श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय , वालचंदनगर या शाळेस प्राप्त झाला . या पुरस्काराचे वितरण मा . संजय- भाऊ बनसोडे - क्रीडा व युवक कल्याण , बंदरे विकास मंत्री , महाराष्ट्र राज्य व मा. विक्रमजी काळे -शिक्षक आमदार , संभाजीनगर यांच्या हस्ते करण्यात आले . आय .टी .एस. या संस्थेने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा परीक्षेतील सातत्यपूर्ण सहभाग व यशाबद्दल तसेच शैक्षणिक , सामाजिक , क्रीडा व कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल रविवार दि. 01 ऑक्टो रोजी लातूर येथे हा पुरस्कार प्रदान केला . हा पुरस्कार प्रमाणपत्र व ट्रॉफीसह विद्यालय प्रतिनिधी प्रा. विशाल पाटील यांनी सपत्नीक स्वीकारला .
हा राज्यस्तरीय पुरस्कार संस्थेला सुपूर्त करण्याचा सोहळा आज विद्यालयात पार पडला . याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. मकरंद वाघ व उपाध्यक्ष मा. प्रशांत महामुनी यांनी उपस्थित राहून हा पुरस्कार प्राचार्य हनुमंत कुंभार यांच्या हस्ते स्वीकारला. याप्रसंगी उपमुख्याध्यापक अरुण निकम , उपप्राचार्य रामनाथ नाकाडे , पर्यवेक्षक काशिनाथ हिरवे , नवनिर्वाचित पर्यवेक्षक शिवप्रसाद कुलकर्णी तसेच शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते . याप्रसंगी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ. वर्षा कुंभार व नवनिर्वाचित पर्यवेक्षक शिवप्रसाद कुलकर्णी यांचे अभिनंदन करण्यात आले . या पुरस्कारामुळे विद्यालयाचे समाजात व परिसरात कौतुक होत आहे .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुदाम पवार यांनी केले.

