श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर सारख्या तालुकास्थळी स्थापन झालेली अशोक सहकारी बँकेचा विस्तार अहमदनगर, पुणे, मुंबई जिल्ह्यात झाला असून गेल्या वर्षभरात बँकेने रु.७७८६९.६९ लाखाचा व्यवसाय केला असून रु. २९८३९.९५ लाखाचे कर्ज वाटप करुन निव्वळ नफा रु.३४०.८९ लाख झाला असल्याची माहिती अशोक सहकारी बँकेचे संस्थापक माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी दिली.
अशोक सहकारी बँक लि., अहमदनगरची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल फरहत कॅफे, अहमदनगर येथे बँकेचे चेअरमन ॲड्.सुभाष सखाहरी चौधरी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी श्री.मुरकुटे बोलत होते.
बँकेला एकूण नफा रु.७२८.३१ लाख झालेला असून सर्व तरतूदी व आयकर वजा जाता एकूण निव्वळ नफा रु. ३४०.८९ लाख झालेला आहे, असे श्री.मुरकुटे म्हणाले.
सभेत प्रारंभी बँकेचे संचालक सीए. एस.झेड. देशमुख यांनी दिवंगर सभासदांसह मान्यवरांच्या श्रद्धांजलीचा ठराव मांडला, तर बँकेचे कार्यकारी अधिकारी प्रदीप थोरात यांनी अहवाल वाचन केले.
बँकेचे चेअरमन ॲड्.सुभाष चौधरी यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत करुन ३१ मार्च २०२३ अखेर बँकेचे भागभांडवल रु. १५०९.७० लाखावर असून रु. ४८०२९.७४ लाखावर बँकेच्या ठेवी असल्याचे सांगितले.
बँकेच्या व्यवसायात आणखी वाढ होण्यासाठी फोन बँकिंग, मोबाईल बँकिंग सुरु करावे, त्याचबरोबर प्रत्येक शाखेच्या कार्यक्षेत्रात बँकेच्या ठेवी व कर्जावरील व्याजदराची माहिती पत्रके घरोघर व व्यावसायिकांपर्यंत पोहोचवून मार्केटींग करावे, अशा सूचना यावेळी सभासदांनी केल्या. त्यावर लवकरच आपले बँकेमार्फत फोन-पे, गुगल पे व इंटरनेट बँकींग सुरु करण्यात येत असल्याचे श्री.थोरात यांनी सांगितले. सभेप्रसंगी अशोक कारखान्याचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, बँकेचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब हळनोर, नेवासाचे माजी सभापती दिगंबर शिंदे, शेतकरी सेवा केंद्राचे श्रीधर कोलते, अशोक कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, विरेश गलांडे, बँकेचे संचालक रणजित बनकर, निलेश मालपाणी, प्रा.गोरख बारहाते, नाना पाटील, ॲड्.पृथ्वीराज चव्हाण, ॲड्. उमेश लटमाळे, ॲड्.ऋषिकेश बोर्डे, निवृत्ती थोरात, जितेंद्र तोरणे, विशाल फोपळे, उद्योजक रोहन डावखर, सौ.पल्लवी डावखर, अमोल कोलते, सौ.शालिनी कोलते, सौ. अनुजाताई पटारे, जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी नानासाहेब मांढरे यांचेसह अशोक कारखाना संचालक मंडळाचे सदस्य, बँकेचे संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

