shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जागर श्री शक्तीचा सन्मान कर्तुत्वान महिलांचा मा. नगराध्यक्षा अनिताताई विजयराव जगताप


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन )
सामजिक बातमी

सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेल्या आपली कर्मभूमी श्री साईबाबांची शिर्डी येथील श्री जगताप पाटील परिवाराच्या सदस्य. समाजसेवेचे व्रत घेतलेल्या परिवारात सौ अनिताताईंनी वारसा प्रकर्षाने पुढे चालू ठेवला  वडील कीर्तनकार व प्रवचनकार असल्याने ओघानेच वक्तृत्वावर प्रभुत्व आहे. अडीच वर्षे नगराध्यक्ष पद व दहावर्षे नगरसेविका पद भूषविले. नगराध्यक्ष काळात शिर्डीमध्ये सर्वात मोठी पाणी योजना आणली. व पाणीप्रश्न सोडविला. विकासाभिमुख दृष्टिकोन व तात्काळ निर्णय यामुळे डॉ. जोशी यांच्या संस्थेकडून आदर्श नगराध्यक्षा पुरस्कार.. शिर्डी परिसरातील रस्ते विकास, स्ट्रीट लाइट, तसेच ड्रेनेज लाईंचे कामे केली. सौ अनिता ताई कोणत्याही पदाचा अभिमान न बाळगता सर्वांमध्ये सहज मिसळतात.शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख पदी असताना अव्याहतपणे  तालुक्यातील   सामाजिक,परीत्यक्त्या तसेच विधवा व सोशिक महिलांसाठी खुप काम केले.या कामाची दखल  घेत शिर्डी लायन्स क्लबचे वतीने आदर्श महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कोविड काळात उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोलीस टाइम्सतर्फे विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले.

विद्यार्थिनीच्या सुरक्षे संदर्भात पोलिसांकडून योग्य सुरक्षा पुरविली. विश्वस्त पदी असताना परिसरातील होतकरू तरुण तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. शिर्डी शहराचा विकास हे ध्येय समोर ठेऊन  ग्रामस्थांना विश्वासात न घेता, श्री साईबाबा संस्थानच्या आपल्या अधिकाराचा  गैरवापर वापर करणार्‍या उन्मत्त अधिकाऱ्यांच्या विरोधात उपोषणाचे हत्यार  उपसले.  आपल्या परखड भूमिकेमुळे अधिकार्‍यांना नमते घ्यावे लागले, व निर्णय मागे घ्यावा लागला. 

अशा सर्वसामन्यांमधून आलेल्या सौ अनिता ताई या शिर्डी व परिसरासाठी एक उत्कृष्ठ उदाहरण आहेत.

वीस वर्षापासून मोठे हळदी कुंकाचा कार्यक्रम राबवत असतो सर्व महिलांना हळदी कुंकू असून दिवाळी सण उत्सवातून दसरा असो सगळ्यांना विश्वासात घेऊन कार्यक्रम महिलांसाठी दरवर्षी दरवर्षी कुठल्या कुठल्या धार्मिक माध्यमातून देवदर्शन घडत असतात.
मुलींसाठी वेळोवेळी शिर्डी पोलीस स्टेशनला निवेदन मुलींच्या सुरक्षा बाबतीत तक्रार करून पोलीस स्टेशन काळजीपूर्व लक्ष देऊन ते व तसेच मुलींसाठी बस सेवा उपलब्ध करून देण्यास पाठपुरावा करून दिला.
close