shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एल. जी. बनसूडे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

एल. जी. बनसूडे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
इंदापूर प्रतिनिधि: एल. जी. बनसूडे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आज महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमधून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या परिसरातील स्वच्छता केली. स्कूलचे अध्यक्ष हनुमंत  बनसुडे यांनी महात्मा गांधीजींच्या चरित्रातून सत्य अहिंसा अस्तेय याविषयी रोजच्या विद्यार्थ्यांच्या दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे देऊन  मार्गदर्शन केले .तसेच आजच्या कार्यक्रमासाठी स्कूलचे अध्यक्ष  हनुमंत  बनसुडे तसेच स्कूलचे सचिव नितीन बनसुडे सर, प्राचार्या वंदना बनसुडे मॅडम ,मुख्याध्यापक राहुल वायसे सर्व विभाग प्रमुख  सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये आजचा कार्यक्रम पार पडला. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राहुल वायसे सर यांनी तर सूत्रसंचालन  प्रकाश दरदरे सर यांनी केले व आभार प्रदर्शन सुजाता ढवळे मॅडम यांनी केले
close