प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
नवरात्र महोत्सव 2023 च्या निमित्ताने केज शहरातील मंगळवार पेठ येथील महिलांनी एकत्र येवून अस्मिता दांडिया ग्रुप स्थापन केला आहे. या ग्रुप च्या माध्यमातून केज परिसरातील इछुक महिला व मुलीं करिता मोफत डांडिया क्लासेसचे आयोजन करण्यात आले आहे.
केज येथील सौ सुनीता राऊत, साधना जमाले पाटील,अस्मिता एखंडे,अस्मिता जमाले पाटील, दामिनी जमाले पाटील, राजश्री गवळी,स्वाती गवळी, अनिता मुंडे,अर्चना स्तवधर,वनिता स्तवधर, श्वेता जाधव, मयुरी राऊत आदी महिलांनी अस्मिता दांडिया ग्रुप स्थापन केला आहे.नवरात्र महोत्सवा निमित्त 04 आक्टोबर 2023 पासून मोफत दांडिया क्लासेस जूनी बालाजी टॉकीज मंगळवार पेठ केज येथे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी यांना तज्ञ मार्गदर्शक यांच्या मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. परिसरातील इछुक महिला , मुलींनी या सुवर्ण संधिचा लाभ घेण्याचे आवाहन या दांडिया क्लासेस चे आयोजक तथा अस्मिता प्लायवुड, टाईल्स ग्रेनाइट चे संचालक दादा जमाले पाटील, अरुण गवळी, संदीप गवळी, दत्तात्रय जमाले पाटील यांनी केले आहे.

