shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बिग बजेट अंकुश चित्रपटाच्या प्रमोशनला नागरिकांची मोठी गर्दी..!


बीडच्या ‘आदित्य शिक्षण संस्थेत‘ पार पडले ‘यशस्वी प्रमोशन’!! 


प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

बांधकाम व्यावसायिक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण करणारे टाकळीचे (ता.केज) सुपुत्र राजाभाऊ आप्पाराव घुले यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण करत एका बिग बजेट सिनेमाची निर्मिती करून मुलगा दिपराजची प्रमुख भूमिका असलेला ’अंकुश’ नावाचा चित्रपट निर्मित केला आहे. या चित्रपटाचे  प्रमोशन बीड शहरातील आदित्य शिक्षण संस्थेते मंगळवारी (दि.३) मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी हजारो प्रेक्षकांनी गर्दी केली होती.




येत्या 6 ऑक्टोबरला अंकुश हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे प्रमोशन चित्रपटातील प्रमुख कलाकारांच्या उपस्थितीत शहरातील आदित्य शिक्षण संस्थेत झाले. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर, अभिनेता दीपराज घुले, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, भाजपचे युवा नेते विष्णू घुले, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, भाजप जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कार्यकारी मंडळाच्या सदस्या डॉ.आदिती सारडा, आदित्य शिक्षण संस्थेचे संचालक, युवा नेते डॉ.आदित्य सारडा, भगवान केदार, भाजपचे देविदास नागरगोजे, रमाकांत मुंडे, कृष्णा मुंडे, डॉ.वासुदेव नेहरकर, नवनाथ शिराळे, सुशिलाताई मोराळे, मुरलीधर ढाकणे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत फड, पेठ बीडचे ठाणेप्रमुख पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद, संभाजी गायकवाड, सुनिल मिसाळ यांच्यासह आदित्य शिक्षण संस्थेचे सी.ए. गिरीष गिल्डा, राहुल खडके, डॉ.आरुण मुंडे, डॉ. पंकज कडू, डॉ. जैन, डॉ. कांबळे, डॉ. हिमांशु, डॉ. भुतडा यांच्यासह सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी आणि भाजपसह सर्वपक्षीय नेतेमंडळी, सामाजिक कार्यकर्ते, कलाक्षेत्रातील व्यक्ती, लोकप्रतिनिधी, केजसह बीड जिल्ह्यातील सरपंच, पदाधिकारी यांच्यासह बीडकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत फड, सुशांत खवतड, धनराज लाटे, चंद्रकांत मिसाळ यांच्यासह विष्णू घुले मित्र परिवार, अंकुश फिल्म टीम, आदित्य संस्थेने प्रयत्न केले.



कलाकारांसह मान्यवरांचा सत्कार

सर्व ‘अंकुश’ टीमचा आदित्य शिक्षण संस्थेतर्फे अंकुश चित्रपटाचा केक बनवून व सर्वांचा शाल श्रीफळ, बुके देऊन सत्कार करण्यात आला. आदित्य शिक्षण संस्थेत झालेल्या बिग बजेट अंकुश चित्रपटाच्या प्रमोशनला मिळालेला प्रतिसाद पाहुन सुप्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर, अभिनेता दीपराज घुले आणि त्यांची टिम भारावून गेली होती. कार्यक्रमास उपस्थित प्रमुख मान्यवरांचा विष्णू घुले यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी चित्रपटातील कलाकार, लोकप्रिय ठरलेली गीते, सादरीकरण यासह चित्रपटाविषयी इतर माहिती दिली. तसेच त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.



चांडाळ चौकडीच्या टीमने जिंकली मने

मान्यवरांच्या हस्ते चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी कलाकारांसह बारामती येथील चांडाळ चौकडी ही विनोदी टीम होती. त्यातील कलाकार रामभाऊ, सुभाषराव, बाळासाहेब यांनी कला सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

close