shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अधिष्ठाता डॉ.वाकोडे यांना शौचालय साफ करायला लावून हीन वागणूक देणाऱ्या खासदाराचा जाहीर निषेध

आग रामेश्वरी अन् बंब सोमेश्वरी

नांदेड प्रतिनिधी:
नांदेड़ येथील डॉ शंकरराव चव्हाण शासकीय मेडिकल कॉलेज व रुग्णालय येथे मागील २४ तासात २४ रुग्णांचे मृत्यु झाले त्यातील बरेचसे रुग्ण जास्त वयाचे, कमी दिवसाचे, अत्यावस्थेतील व संदर्भ सेवे साठी लांब अंतरावरून आलेले होते. या चौकशीसाठी शासकीय यंत्रणेतील पदाधिकारी चौकशी साठी जाण्यापूर्वी हिंगोली येथील खासदार हेमंत पाटील यांनी मेडिकल कॉलेज येथे जाऊन मी चौकशीसाठी आलो आहे असे सांगून तेथील अधिष्ठाता डॉ. शामराव वाकोड़े व बालरोग विभाग प्रमुख आणी  इतर डॉक्टर यांना जबरदस्तीने स्वच्छतागृहा जवळ नेऊन हातात झाड़ू देऊन तेथील बाथरूम व संडास स्वच्छ करण्यास भाग पाडले. एका उच्चपदस्थ अधिकारी व डॉक्टर यांना अश्याप्रकारे निंदनीय व खालच्या दर्जाची वागणुक सुशिक्षित खासदार कडून होणे ही निंदनीय व अपमानास्पद बाब आहे. काही वर्षापूर्वी याच रुग्णालयात डॉ वाकोड़े  (ENT सर्जन) त्यावेळी सिव्हील हॉस्पिटल जे गावात होते त्यावेळी देखील अश्याच प्रकारे वागणूक दिली गेली होती, त्यावेळी देखील राजकीय व्यक्ति व त्यांचे सहकारी यांनी डिन यांना स्वच्छता गृह साफ करायला लावले होते.
डिन हे पद व्यस्त कामाचे असून त्यांना रुग्ण उपचार व देखरेखी साठी जास्त वेळ द्यावा लागतो. खरे तर व्यवस्थापन हे वेगळे काम असते व डिन ने ते देखरेख करावे लागते. बऱ्याच ठिकाणी स्वच्छता कर्मचारी व त्यांच्या संघटना ऐकत नाही त्यांची यूनियन असते त्यात काही कायम स्वरूपी व काही कंत्राटी स्वरूपी कर्मचारी असतात हे कंत्राटी कर्मचारी नोंदणीकृत संस्थे मार्फत भरवले जातात व असे कर्मचारी राजकीय नेते यांचे नातेवाईक अथवा जवळचे सहकारी असतात त्यातील बरेचसे कर्मचारी मनापासून काम करत नाही.

१५०० पेक्षा जास्त खाटांची संख्या असलेल्या रुग्णालयात दुप्पटीने रुग्ण भरती केले जातात बरेच रुग्ण हे आर्थिकदृष्टीने दुर्बल घटक तसेच अत्यास्वस्थ कींबहुना शेवटच्या काही घटका मोजत असलेले असतात. नांदेड़ पासून ८० ते १०० की. मी अंतरा पर्यंत  मोठे शासकीय रुग्णालय नाही व या रुग्णालयात नांदेड़, हिंगोली, यवतमाळ, परभणी, वाशिम तसेच निज़ामाबाद आंध्र प्रदेश व तेलंगना येथून मोठ्या प्रमाणात तेथे उपचारासाठी रुग्ण येतात.

औषधे कमी आणि रुग्ण अत्यावस्थ यामुळे मृत्युचे प्रमाण जास्त. स्पर्श दंश चे रुग्ण हे प्रथम बुवा बाजी व इतर उपचारा नंतर हॉस्पिटल ला वैद्यकीय उपचारा साठी येतात. विषारी सर्प दंशाचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहेत, असे व बरेचसे रुग्ण शेवटची घटका मोजत येतात असे अनेक रुग्ण आहेत.
डॉक्टराची रिक्तपदे अनेक दिवसापासून भरले नाही तसेच इतर कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी यांची ५०% पेक्षा जास्त पदे रिकामी आहेत त्यामुळे कामाचा भार जास्त आहे. औषधाची कमतरता असते आणि गरज मात्र मोठ्या प्रमाणात असते. शासनाचे आरोग्य बाबत चे बजेट कमीच आहे व  शासन आरोग्यावर खर्चा साठी उदासीन आहे. गरजेची सुविधा वेळेवर मिळत नाही आणि मिळाली तर उपलब्ध होत नाही. खरेदी वर बंधने जास्त आहे. नर्सिंग कर्मचारी कमी पडतो बरेचसे कर्मचारी गावातीलच असून राजकीय लोकासोबत लागेबांधे असलेले असतात अशा प्रकारे सर्व बाबतीत एकाधिक स्तर अपयश असून त्या मधे डिन अथवा अधीक्षक यांचा संबंध नसतो. खरे तर नियमित औषध पुरवणे, रिक्त पदे भरणे, नवीन उपकरणे उपलब्ध करुन देणे व्यवस्थापन बघने हे सर्व शासकीय यंत्रणे अंतर्गत असून एखाद्या व्यक्ती कड़े बोट दाखवून त्या व्यक्तिला दोषी ठरवणे व त्याला अपमानास्पद वागणूक देणे किंवा निलंबित करणे  चुकीचे आहे.
शासनातील दोष हे डिन च्या माथी मारणे अतिशय चुकीचे आहे, आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी असा हा प्रकार आहे, या उच्च पदावर काम करणाऱ्या व्यक्तिला वरच्या अधिकाऱ्याची ही मदत नसते. त्यामुळे बरेचदा डॉक्टर सिव्हील सर्जन मेडिकल अधीक्षक अथवा डिन ह्या पोस्ट घेत नाही.

गोरगरीब रुग्णाना शासकीय रुग्णालया शिवाय पर्याय नाही मराठवाड्यातील या भागात गरीब रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे व यांचा भार रुग्णालया वर पडतो. कमी व अपुरी सुविधा, औषधे, कर्मचारी या सर्वाना बरोबर घेऊन काम करणे अधिकाऱ्याला कठिण होते. असे विदारक चित्र दिसून येते डॉ. ची सेवा ही ८ तास सीमित नसून त्याना २४ तास कामावर लक्ष ठेवावे लागते ही एक प्रकारे तारेवरची कसरत आहे, त्यांचे पगार वेळेवर होत नाही आणी त्याना संरक्षण ही मिळत नाही.
मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथील जूनियर डॉक्टर १७/१८ तास काम करतात, ज्यादा काम करतात तरी सुद्धा त्याना चांगल्या प्रकारची वागणूक मिळत नाही. यामुळे शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य यांची हेडसाळ होते तसेच आत्महत्या, वैद्यकीय कर्मचारीवर आघात यांचे प्रमाण वाढले आहेत हे सर्व असुरक्षिततेची बाजु दिवसेंदिवस वाढत आहे. नांदेड़ येथील घटनेचा  सर्व क्षेत्रातून तीव्र निषेध तीव्र संताप व्यक्त होत आहे, यामधे आय एम ए, जूनियर डॉक्टर असोसिएशन, मार्ड संघटना, मेडिकल टीचर असोसिएशन, शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांच्या तर्फे निषेध व्यक्त केला जात आहे.


या घटनेची विचारपूस होऊन हे कृत्य करणाऱ्या विरुद्ध तीव्र स्वरूपाची व त्वरित कारवाही व्हावी अशी मागणी आम्ही या सर्व संघटनेंच्या वतीने करित आहोत.

*डॉ.रविंद्र कुटे
अध्यक्ष: इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम.ए.- महाराष्ट्र राज्य)

*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close