शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा:-
फाॅरेक्स मार्केट मध्ये अनेक अनधिकृत कंपन्या विनादिक्कतपणे भारतीयांना भारतीय एजंटांचीच नेमणूक करून लुटालूट करत आहेत. त्याचे थोडक्यात सारांश सांगायचे तर फाॅरेक्स मध्ये काम करणार्या कंपन्या थाटामाटात ऑफीस टाकून काम करतात... पण फार मोठी रक्कम जमा झाल्यानंतर भारतीय नागरिकांना गंढवून पळ काढतात. हा अनेक दिवसांपासून अनुभव येत आहे.भारतीय नागरिकांची यामुळे ससे होलपट होत आहे.हे आता थांबले पाहिजे..
फाॅरेक्स मार्केटमध्ये आपण उघडलेल्या डिमॅट मध्ये नफ्याचे विड्राॅल टाकल्यानंतर बॅंक खात्यात पैसेच जमा होत नाहीत..अशा पध्दतीने भारतीयांना परदेशातील अनधिकृत कंपन्या सर्रास पणे लुटत आहेत. भारतीय नागरिकांचा पैसा परदेशात जात असताना यावर भारत सरकारचे फारसे नियंत्रण नसल्याचे दिसून येते.. त्यामुळे अनेक परदेशी अनधिकृत कंपन्यांचे फावत आहे.
यासाठी कोणत्याही एजंटने फाॅरेक्स मार्केट बद्दल माहिती सांगत असेल तर पहिल्यांदा त्याचे आधार कार्ड, पॅनकार्ड,काम करत असलेल्या ठिकाणाचे किंवा कंपनीचे ओळखपत्र त्यांचेकडून मागवा.. कंपनीचे डिटेल्स मागवा.. ही सर्व माहिती दिली तरी त्या एजंटाची प्रत्यक्ष भेट घ्यावी. पत्याची माहिती व सदर व्यक्तीची ओळख करून घ्यावी. कधी कधी पत्ता खोट्या पध्दतीने टाकून एडीट करून पाठवतात. त्यामुळे पुन्हा पुन्हा पत्ता विचारणे आवश्यक आहे. खात्री पटल्याशिवाय त्याचेबरोबर कुठलेही काम सुरू करू नये.. अन्यथा हे एजंट भारतीय गुंतवणूक दारांना गंडवल्याशिवाय रहात नाही. हा अनुभव अनेकांना सर्रास येत आहे.. तर भारतीय गुंतवणूक दारांनो सावध रहा .. आपल्या पैशाची बचत करा..देशाची लुट थांबवा..
आपल्या भारतीय नागरिकांना यापासून वाचवण्यासाठी हा विषय सर्वदूर पोहोचव...शेअर करा...!!