तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन वेळी अधिकारी यांनी लिखित दिलेल्या आश्वासनाला केराची टोपली
सुरवड गावातील वडार समाजातील नागरिकांचे प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांना भोवणार का ?
इंदापूर तालुका प्रतिनिधी
संत तुकाराम महाराज पालखी मार्ग अधिकारी व ठेकेदार व वकील यांनी इंदापूर तालुक्यातील सुरवड गावातील जमिन गट नं ३०५ व २०७ मध्ये रस्त्याचे कामकाज करण्यासाठी पोलीस बंदोबस्त घेतला पण रस्त्याचे काम मात्र २०० ते २०६ या जमीन गट नंबर मध्ये केले.सदर अन्यायाच्या विरोधात दि.७ जुन २०२४ रोजी बारामती उपविभाग कार्यालय येथे आत्मदहन आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सविस्तर हकीकत अशी की,इंदापूर तालुक्यातील सुरवड गावातील वडार समाजातील नागरिकांची मौजे. सुरवड येथील जमिन गट नं. २०० ते २०६ हा आहे.सदर पालखी महामार्ग रस्त्याचे कामकाजासाठी सदर गटातील क्षेत्राचे भुसंपादन झाले नसताना बेकायदेशीपणे महामार्गचे कामकाज करीत असलेले एन. ए. इफ्रास्टक्चर कंपनी विरोध यापुर्वी (दि. ४)मे रोजी बावडा पोलिस चौकीत तक्रार दाखल केली आहे.या सर्व घटनेबद्दल इंदापूर भुमि लेख अधिकारी यांच्या मनमानी कारभार विरोध इंदापूर तहसील कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले होते.संबधित अधिकारी यांनी लिखित स्वरूपात उत्तर दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले होते.
पोलीस बंदोबस्त एका गटासाठी काम मात्र दुसऱ्या गटात केले हे कसलं गौडबंगाल?
तरी ही दिनांक २७ मे २०२४ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ च्या दरम्याने सदर ठेकेदार कंपणीचे अधिकारी श्री पवार, श्री क्षिरसागर, व महामार्गाचे वकिल श्री गवळी यांनी सक्षम अधिकारी बारामती यांचेकडून जमिन गट नं ३०५ व २०७ मध्ये रस्त्याचे कामकाज करण्यासाठी पोलीस बंदोबस्त घेवुन त्या ठिकाणी आले. त्यावेळी वडार समाजातील नागरिकांनी हरकत घेतली असता त्यांनी त्याची दखल न येता त्यांनी बेकायदेशीरपणे वडार समाजातील नागरिकांच्या खाजगी जागेत व गटातील क्षेत्रात अतिक्रमण करून ते क्षेत्र बळकावून पोलीस बंदोबस्तामध्ये रस्त्याने काम केले आहे.
वास्तविक पाहता सक्षम अधिकारी यांनी त्यांना पोलीस बंदोबस्त हा जमिन गट नंबर ३०५ व २०७ या संदर्भात दिलेला असताना त्यांनी त्या पत्राचा व पोलीस बंदोबस्ताचा आधार घेवून तक्रारदार यांच्या खाजगी जमिनीच्या गटनंबरचे क्षेत्र भुसंपादित झालेली नसताना अतिक्रमण करून बेकायदेशीपणे रस्त्याचे कामकाज केले आहे. तक्रारदार यांचा गट नंबर २०५ व इतर लोकांचे गटातील क्षेत्राचा सक्षम अधिकारी तसेच मंडल अधिकारी, बावडा तसेच गाव कामगार तलाटी बावडा यानी त्यांना कोणत्याही प्रकारचा ताबा दिलेला नसताना सदर कंपणीने अतिक्रमण करून रस्त्याचे कामकाज केलेले आहे हे कसले गौडबंगाल आहे यांची चर्चा रंगली आहे.
तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन वेळी अधिकारी यांनी लिखित दिलेल्या आश्वासनाला केराची टोपली की, पालखी मार्गाचे अधिकारी, ठेकेदार, भुमि लेख अधिकाऱ्यांचे संगनमत
सदर बेकायदेशीर कामाने वडार समाजातील लोकांवर फार मोठा अन्याय झाला असल्याने वडार समाजातील लोकांच्या खाजगी जमिनीचे भूमी अभिलेख इंदापुर यांचे उपअधिक्षक श्री पिसे व मोजणीदार श्री थिटे यांनी बेकायदेशीपणे पालखी महामार्गाचा नकाशा दुरूस्ती करून तसेच बेकायदेशीर दुरूस्तीच्या आधारे चुकीचे अहवाल सक्षम अधिकारी यांचेकडे पाठविला होता. त्याबाबतीत तक्रारदार यांच्या अर्जाचा सक्षम अधिकारी व भूमि अभिलेख यांनी कोणतीही दखल घेत नसल्याने नाईलाजाने तक्रारदार यांनी दिनांक २० मे २०२४ रोजी धरणे व उपोषानाचे अंदोलन इंदापुर तहसिल कचेरी समोर केले असता सदर श्री पिसे यांनी लेखी पत्र देवून फेरमोजणी दिनांक १० जुन नंतर करण्यात येईल असे कळविले होते. असे असताना सदर पालखी महामार्गाचे ठेकेदार यांनी खोडसाळपणे व बेकायदेशीरपणे पोलीस बंदोबस्त घेवुन वडार समाजातील लोकांच्या य मिळकतीत अतिक्रमण करून रस्त्याचे कामकाज केले आहे. म्हणजे तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन वेळी अधिकारी यांनी लिखित दिलेल्या आश्वासनाला केराची टोपली की, पालखी मार्गाचे अधिकारी, ठेकेदार, भुमि लेख अधिकाऱ्यांनी संगनमत करून वडार समाजातील लोकांच्या मिळकतीत पोलीस बळाच्या जोरावर दंडेलशाही , दडपशाही सुरू केली आहे.
सुरवड गावातील वडार समाजातील नागरिकांचे प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांना भोवणार का ?
पालखी मार्ग सुरू झाल्यापासून बारामती उपविभाग कार्यालय (प्रांत कार्यालय), पालखी मार्गाचे अधिकारी, इंदापूर भुमि लेख कार्यालय, ठेकेदार हे ना त्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात असतात.इंदापुर भुमि लेख कार्यालय यांच्या बाबतीत अनेक तक्रारी सह आर्थिक लागेबांधे संबंधित विविध चर्चा रंगल्या आहेत.
टक्केवारी, मलिदाचे लोन खाली पासून वरपर्यंत पोहोचले आहे का ? अशी कुजबूज सुरू झाली आहे.तसेच सुरवड गावातील वडार समाजातील नागरिक यांच्या जमिनीच्या अनेक नकाशा तसेच विविध कागदपत्रे यांच्या फेरफार करून बनवाबनवी करून अधिकारी अरेरावी करत असल्याने हे प्रकरण अनेक अधिकाऱ्यांना भोवणार का?असे चिन्ह दिसत आहेत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ह्या प्रकरणाबाबत संबिधित अनेक तक्रारी गेल्या असल्याने हे महाराष्ट्राभर प्रकरण पेट घेणार आहे असे चित्र निर्माण झाले आहे . तसेच सदर प्रकरणाबाबत अनेक अधिकारी यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.त्यामुळे वडार समाजातील लोकांना न्याय मिळणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
सुरवड (ता.इंदापुर)पालखी मार्गाचे अधिकारी व ठेकेदार यांनी एका गटासाठी पोलिस बंदोबस्त घेतला आणि काम मात्र दुसऱ्याचं गटात करताना (छायाचित्र: कैलास पवार)