चुक नगर पालिकेची अन् भुर्दंड मात्र माजी सैनिकांना
श्रीरामपूर प्रतिनिधी:
अनेक दिवसांपासून माजी सैनिकांची घरपट्टी माफीची मागणी असल्याने घरपट्टीचा विषय शासनाच्या विचाराधीन होता त्या अनुषंगाने सन 2022 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने शासन निर्णय काढून त्यामध्ये सरसकट घरपट्टी माफ न करता केवळ संकलित कर हा माफ करण्यात आला इतर कर लावले आहेत तरीही या निर्णयामध्ये सर्व माजी सैनिक समाधानी आहेत या सर्व गोष्टींसाठी संबंधित शासनाने ठरवून दिलेले कागदपत्र जे माजी सैनिक शहरी विभागात नगरपरिषद अंतर्गत राहतात त्यांनी नगर परिषदेकडे अगोदरच सुपूर्द केले आहेत आणि त्यामुळे सण 2022 /23 या वर्षाचा संकलित कर माफ करण्यात आला परंतु आत्ता सन 2023 /24 या वर्षाची जी पट्टी आली आहे तिच्यासाठी नगरपरिषद पुन्हा कागदपत्रांची मागणी माजी सैनिकांकडे करत आहे.
ज्यामध्ये जुन्या यादीत सैनिकांचे कागदपत्र व नाव नमूद केले आहे त्या सैनिकांकडे पुन्हा पुन्हा कागदपत्रांची मागणी केली जात आहे शहरी विभागात राहणारे सर्व माजी सैनिक पट्टी आल्यापासून म्हणजे गेल्या सहा महिन्यापासून पट्टी भरण्यासाठी स्वतः नगर परिषदेमध्ये जात आहे परंतु नगरपरिषद पट्टी भरून घ्यायला तयार नाही आणि शहरातील इतर रहिवासी पट्टी भरत नाहीत म्हणून त्यांच्या पाठीमागे पट्टी भरण्यासाठी घंटागाडी व इतर गाड्यांमध्ये अलाउंस करून तगादा लावला जात आहे, त्रिदल सैनिक संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा वसूली अधिकारी व उपमुख्याधिकारी यांची वारंवार भेट घेतली सॉफ्टवेअर सिस्टीम चा प्रॉब्लेम आहे पट्टी भरता येणार नाही, अशा प्रकारचे उत्तर देण्यात आले शेवटी विनंती करण्यात आली की कमीत कमी पाणीपट्टी आणि संकलित कर वगळून बाकी तरी पट्टी आमची भरून घ्या जेणे करुन शास्ती तरी लागणार नाही आणि त्या अनुषंगाने नगरपरिषदेने संकलित कर व पाणी पट्टी भरून घेतली परंतु उशीर झाल्याने घरपट्टी आणि पाणीपट्टीला असणारी शास्ती सर्व माजी सैनिक पट्टी धारकांना पालिकेची चूक असूनही नाहक भुर्दंड दिला आहे. त्या अनुषंगाने मा. सोमनाथ जाधव मुख्याधिकारी नगरपरिषद श्रीरामपूर यांना शहरात रहिवाशी असलेले माजी सैनिक, त्रिदल सैनिक सेवा संघाचे नगर उत्तर विभागाचे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार, तालुका अध्यक्ष संग्रामजीत यादव, पट्टी धारक मेजर संपत लगड हे कार्यालयात भेटून आपल्या या पट्टी संदर्भात व्यथा मांडत असताना लवकर बोला माझ्याकडे वेळ नाही आणि एकदा सांगितले आहे तुम्हाला सॉफ्टवेअर सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे माझा नाही, मला एवढा वेळ नाही असे म्हणत कुठल्याही परिस्थितीत माजी सैनिकांची मुख्याधिकाऱ्यांनी
तक्रार ऐकून घेतली नाही. भारत मातेची सेवा केलेल्या सैनिकांसाठी वेळ नाही परंतु ठेकेदार व टेंडर धारक यांच्या साठी मात्र नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे भरपूर वेळ आहे, कारण त्यामधून ठरल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात मिठाई बॉक्स मिळणार असते,आता या मिठाई बॉक्स मध्ये मिठाईच असते की अन्य काही हे सर्वश्रृत आहे,तशी सांगायाची आवश्यकता नाही ? मात्र मग त्या ठेकेदारांप्रमाणे या सैनिकांकडून तरी काय मिळणार ? या हेतूने त्यांच्याकडे वेळ नसणे हे स्वाभाविकच.अशा प्रकारची खंत माजी सैनिकांकडून व्यक्त केली जात असल्याचे त्रिदल सैनिक सेवा संघाचे नगर उत्तर विभागाचे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार व तालुकाध्यक्ष संग्रामजीत यादव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111