तंबाखू ही गुटखा, पान मसाला, सुपारी मिश्रण , बीड़ी , सिगारेट , चिलम या विविध माध्यमातून घेतली जाते . यात निकोटिन हे प्रमुख रसायन कर्करोगाला कारणीभूत ठरते . या व्यतिरिक्त अनेक घातक रसायने शरीरात जातात . 13 पेक्षा जास्त कर्करोग यामुळे होतात . तोंडाचा कर्करोग हा प्रमुख आहे . जगात सर्वात जास्त तोंडाचे कर्करोगाचे रुग्ण भारतात आहेत . अप्रत्यक्ष धूम्रपानामुळे देखील अनेक आजार व कर्करोग होतात . एका सिगारेट मधे 7000 रसायने व 200 पेक्षा जास्त विषारी रसायने असतात . यातील 69 तत्वे कर्करोगाला प्रवृत्त करतात . धूम्रपानामुळे 20 टक्के कर्करोग तर 30 टक्के मृत्यु दरवर्षी होतात . दरवर्षी भारतात 13 ते 14 लाख कर्करोग तम्बाखूमुळे होतात व हा आकड़ा 2025 मधे 15.7 लाखापर्यन्त पोहोचल असा अंदाज आहे . 40 टक्के कर्करोग टाळता येण्यासारखे असतात.
तम्बाखू बरोबर इतर व्यसने असल्यास ते अतिशय मारक ठरते . युवकांमधे तम्बाखूचे प्रमाण वाढते आहे . लाखामधे 10 युवकांना तम्बाखूजन्य पदार्थमुळे कर्करोग होतो . जितक्या कमी वयात धूम्रपान तेवढे त्याचे घातक परिणाम जास्त . गुटख्याचे वाढते प्रमाण युवकामधे चिंतेची बाब आहे . गुटका सेवनामुळे तोंडाचा , घशाचा , अन्ननलिकेचा , स्वादुपिंडाचा कर्करोग होतो .
तम्बाखू आज मौज , कल मज़बूरी और फिर मौत .
जगात दरवर्षी 80 लाख लोक तम्बाखूमुळे मृत्युमुख़ी पडतात आणि तम्बाखू हे मृत्युच प्रमुख दुसर कारण आहे . अनेक रुग्ण प्रतिवर्षी अप्रत्यक्ष धूम्रपानामुळे मरतात . भारतात दरवर्षी 13 लाख़ मृत्यु व साधारणतहा प्रति दिवशी 3500 मृत्यु तम्बाखूमुळे होतात
शरीरातील विविध अवयवावर परिणाम असे
1. ह्रदय : रक्तदाब , अंजायणा , हार्ट अटैक , कार्डिओमायोपथी , वारंवार हार्ट अटैक सम्भवतात .
2. रक्तवाहिन्या : बारीक़ होत जाने , झड़ने ,रूकावट येणे , हात व पाय झड़ने सड़ने , गैंग्रीन होणे .
3. तोंड : दातावर थर ज़मने , किड लागने , दुर्गंधी येणे , हिरडया ख़राब होणे अणि कर्करोग .
4. मेंदू : लखवा , रक्तवाहिन्या झड़ने
5. केस : गळणे , टक्कल पडने
6. फुफुस : अस्थमा , धाप वाढणे , वारंवार जंतुसंसर्ग आणि कर्करोग
7. पचनसंस्था : अन्ननलिका , घसा , तोंडाचा व जबड्याचा , मुत्राशयाचा , किडनीचा , आतड्याचा , रक्ताचा , स्वादुपिंडाचा कर्करोग .
8. प्रजनन संस्था : शुक्रजंतु कमी होने , गर्भपात , लवकर रजोंवृत्ती , जोम व शक्ति कमी होते .
9. डोळे : दृष्टीदोष , मोतिबिंदु
10. गर्भधारणा : लहान व कमकुवत बाळ , कमी दिवसात प्रसूति , जन्मता रोगांची लागण , मेलेले मूल , शारीरिक व मानसिक व्यंग , मतिमंद , फाटलेला ओठ , ताळुतिल भेग असणारे बालक .
एकंदर धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींच आयुष्मान कमी झालेले दिसून येते.
यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने 2024 साठी घोषवाक्य दिले ते असे कि " लहान मुलांवर तम्बाखू उत्पादन करणाऱ्या कारखानदारींचा प्रभाव कमी करणे असा आहे. भपकेबाज जाहिरातीने तरुण वर्ग सिगारेट , बीड़ी , गुट्का , तम्बाखू याकडे आकर्षित होतो व शेवटी अनेक आजाराणा कारणीभूत ठरतो.
तरुणांना तम्बाखूच्या या खाईतून वाचविणे महत्वाचे आहे.
या जनजागृति साठी दरवर्षी 31 मे हा तम्बाखू विरोधी व कर्करोग प्रतिबन्ध दिवस म्हणून सम्भोधला जातो.
चला तर मग "मी तम्बाखू सेवन करणार नाही व इतरांनाही घेऊ देणार नाही "अशी शपथ घेऊ या.
डॉ.रविंद्र कुटे
पुर्व अध्यक्ष:
आय एम ए (महाराष्ट्र राज्य)
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111