वैशाख कृष्ण नवमी - दशमी - दिन विशेष - संत मुक्ताबाई पुण्यतिथी ।।
संत मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे ई.स. १२७९ साली झाला. या महाराष्ट्रातील संत कवयित्री होत्या. संत मुक्ताबाई “मुक्ताई” या नावाने ओळखल्या जातात. रुक्मिणीबाई व विठ्ठलपंत हे त्यांचे आई वडील. संत निवृतीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते.
*मुक्ताबाईच्या हातून ही विश्व उद्धाराचे कार्य घडले. योगी चांगदेव एवढा मोठा तपस्वी होता. पण त्याने गुरु केला नसल्याने त्याला ईश्वरदर्शन झाले नव्हते. मुक्ताबाईंनी योगी चांगदेवाना 'पासष्टी' चा अर्थ उलगडून दाखविला.*
*मुक्ताबाईच्या अनुग्रहाने चांगदेवाना आत्मरुपाची प्राप्ती झाली, तेव्हा त्यांचे १४०० वर्षाचे आयुष्य धन्य झाले. “आठ वर्षाची मुक्ताई १४०० वर्षाच्या चांगदेवांची अध्यात्मिक गुरु बनली.” कृतार्थतेने चांगदेव म्हणतात, "मुक्ताई करे लेइले अंजन".*
*संत मुक्ताबाईंचा मृत्यू :-*
*संत ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर ज्येष्ठ बंधू निवृतिनाथ मुक्ताबाईंना घेऊन तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. ते तापी नदीवर आले असता अचानक वीज कडाडली. संत मुक्ताबाई प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त झाल्या { १२ मे १२९७ }. मुक्ताबाईंची समाधी जळगाव जिल्ह्यातील कोथळी येते आहे.
🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
॥ श्री स्वामी समर्थ ॥
*हे ईश्वरा ! सर्व जीवसृष्टी सुखी राहो ! सर्वांचे जीवन रोगमुक्त राहो ! आम्हा सर्वांना कुशलता दे ! सर्व दुःखमुक्त राहोत ! हे ईश्वरा ! सर्वत्र शान्ति असु दे !
जयगिरनारी जयश्रीराम🪷🪷🪷🪷🪷🚩🙏🏻