shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ निर्वाण यांनी गोशाळेस चारा, वृद्ध नागरिकांना किराणा साहित्य वाटप करून केला वाढदिवस साजरा


 श्रीरामपूर प्रतिनिधी:
सामाजिक कार्यकर्ते श्री. विश्वनाथ शंकर निर्वाण यांनी श्रीरामपूर परिसरातील माऊली वृद्धाश्रमास किराणा साहित्य तसेच येथील गौशाळेस चारा वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी येथील जागृत देवस्थान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी त्यांनी विधीवत पूजन केले. प्रसंगी सचिव सौ. कल्पना वाघुंडे यांनी मंगल औक्षण करत श्री. निर्वान यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. श्री.सुभाष वाघुंडे यांनी श्री. निर्वाण तसेच  आश्रमाविषयी माहिती विशद करून आश्रमास मदतीचे आवाहन केले. 

प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश ढोकणे, बाळासाहेब सानप, सुलतानभाई पठाण, निसार भाई शेख, अनवरभाई शेख, मुन्नाभाई शेख, प्रणव थोरात, अशपाक (भय्याभाई) पठाण, तेजस उंडे, सर्जेराव खरात, गणेश खरात, अनिल खरात, गजानन वैराट, दत्तात्रेय खिलारी, दिनेश जेजुरकर, शुभम नामेकर तसेच मोठ्या संख्येने आश्रमातील आजी - आजोबा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार राजेंद्र देसाई यांनी केले, मिष्ठांन्न भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
close