shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आई-वडिलांची प्रेरणा तसेच इच्छाशक्ती जिद्द यामुळेच सर्वोच्च एवरेस्ट शिखर सर करु शकले - पो.नि.द्वारका डोके

मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्थेच्या वतीने एवरेस्ट शिखर सर करणाऱ्या पो. नि. द्वारका डोके यांचा सन्मान

 श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूरच्या सुकन्या व  नाशिक येथे कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक कु. द्वारका डोके यांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एवरेस्ट सर केले आहे याबद्दल त्यांचा सर्वच क्षेत्रातून सन्मान होत आहे,श्रीरामपूर येथील मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्था अध्यक्ष अनिल साळवे सर तसेच सर्व पदाधिकारी यांच्यावतीने सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी  मनोगत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक द्वारका डोके मॅडम यांनी एवरेस्ट शिखर सर करण्यापूर्वी दोन ते तीन वर्ष अभ्यास तसेच शारीरिक मानसिक अशा विविध प्रकारची तयारी करत यापूर्वी छोटे मोठे अनेक शिखरे सर केले, याच अनुभवाच्या बळावर तसेच आई-वडिलांची प्रेरणा व इच्छाशक्ती जिद्द असल्याने सर्वोच्च शिखर एवरेस्ट सर करू शकले, महाराष्ट्र पोलीस दलातील प्रथम महिला अधिकारी यांनी शिखर केल्याबद्दल मला अभिमान आहे यासाठी सर्व स्तरातील व्यक्तींचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत पोलीस निरीक्षक द्वारका डोके यांनी व्यक्त केले.

 प्रसंगी प्रा गांगड यांनी कु.डोके मॅडम यांच्या कार्याचे इतिवृत्त माहिती विषद केली.अध्यक्ष अनिल साळवे सर, उद्योजक सुनील कर्जतकर मा. पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बनकर, ऍड.दादासाहेब निघुट, ऍड. प्रमोद सगळगिळे,सहाय्यक फौजदार राजेंद्र गोडगे, प्रा. श्री.गांगड सर, किशन शेठ आहूजा, इंजि. अविनाश काळे, मा.नगरसेवक दिलीप नागरे प्रा. राजेंद्र हिवाळे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जपे,प्रा.पवार सर, जितेंद्र पाटील, विनोद चोरडिया, डॉ.दिवेकर, बाळकृष्ण कांबळे, संतोष गायकवाड, विश्वास भोसले, पत्रकार राजेंद्र देसाई आदी  यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र हिवाळे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष ऍड. दादासाहेब निघुट यांनी मानले.
*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111
close