shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बार्टी कडून जागतिक पर्यावरण दिन निमित्ताने लिबाची वृक्ष लागवड


वसमत / प्रतिनिधी 
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोंवदे यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत मिलिंद आळणे यांच्यावतीने दरवर्षी पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे पर्यावरण विषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्याचा मुख्य हेतू आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुवरे आळवीती, संत तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली अन्य कोणी नसून आपलेच सोयरे म्हणजेच नातेवाईक आहेत ही जाणीव आमच्या संतांनी संस्कृतीने फार आधीपासून आमच्या मनात खोलवर रुजवली आहे .

या वृक्षारोपणावेळी लिंबाचे वृक्ष लावण्यात आले. 
यावेळी समतादूत मिलिंद आळणे ,जयसिल मेंढे ,प्रणव आळणे , शिवकन्या गायकवाड, आराधना आळणे आदी उपस्थित होते.

*पत्रकार मलिंद आळणे - वसमत
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111
close