श्रीरामपूर / प्रतिनिधी
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील तालुक्यातील अशोकनगर येथे अशोक ग्रामीण शिक्षण संस्था संचलित अशोक पॉलिटेक्निकच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रियेला २९ मे पासून सुरुवात झाली असून तंत्रशिक्षण संचालनालय मार्फत अशोक पॉलिटेक्निक, अशोकनगर (एफसी कोड-५३९५) महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती प्राचार्य अंजाबापू शिंदे यांनी दिली आहे.
अशोक पॉलीटेक्निकमध्ये अनुभवी, तज्ञ प्राध्यापक, सोयी-सुविधा यामध्ये सुसज्ज व निसर्गरम्य ईमारत, इंटरनेट सुविधा, १०० टक्के प्लेसमेंट, वसतिगृह, खानावळ, स्कुल बस उपलब्ध असून सर्व सोयींनीयुक्त अशी कार्यशाळा, औद्योगिक भेटी, अनुभवी तज्ञांचे व्याख्याने, विविध उपक्रम, भव्य ग्रंथालय, खेळासाठी मैदान, अभ्यासिका कक्ष इत्यादी सुविधा उपलब्ध आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई, यांच्याकडून दहावीनंतरच्या पदविका अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडचणी येऊ नये व इयत्ता दहावी नंतर काय? याकरिता अशोक पॉलिटेक्निक अशोकनगर येथे प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र व मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करण्यात आले आहे.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे पडताळणी, ऑनलाईन फॉर्म निश्चिती करणे, केंद्रातून संस्था व शाखा निवड, विकल्प, अर्ज भरणे प्रवेशाच्या फे-या व प्रवेश घेवू इच्छिणा-या विद्यार्थ्याला हवे असलेले शैक्षणिक संकुल व हवी असलेली शाखा मिळावी यासाठी नवीन नियमावलीनुसार विकल्प अर्जातील विविध पर्यायावरील पसंती आदी बाबींची विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण माहिती मिळणार असल्याचे प्राचार्य अंजाबापू शिंदे यांनी सांगितले. प्रवेश प्रक्रियेबाबत काही शंका किंवा अडचणी असल्यास केंद्र प्रमुख प्रा.रामेश्वर पवार, मो.9730981735 यांचेशी संपर्क साधावा असेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111