shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दत्तकला शिक्षण संस्थेस पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या सुविधा केंद्रास (FC Center) मान्यता


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ५/ स्वामी चिचोली (भिगवण), ता. दौंड, जि. पुणे येथील दत्तकला शिक्षण संस्थेला पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या सुविधा केंद्रास तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन यांचेकडून मान्यता देण्यात आलेली आहे. शै. वर्ष २०२४-२५ पासुन संस्थेच्या दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिटयुशन्स (डिटीई कोड: ६६२८) या महाविद्यालयात पदविका अभियांत्रिकीमध्ये सिव्हील अभियांत्रिकी या अभ्यासक्रमाबरोबरच कॉम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रीकल, ई एण्ड टी. सी आणि मेकॅनिकल अभियांत्रिकी हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. करमाळा, कर्जत तसेच दौंड या तीनही तालुक्यातील विद्यार्थ्यांना वरील सर्व पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी त्यांच्या जवळील भागातच सहजपणे सोय व्हावी ही गरज लक्षात घेवून महाविद्यालयाला शै. वर्ष २०२४-२५ मधील प्रथम व थेट द्वितीय वर्ष पोस्ट एसएससी पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सुविधा केंद्रास शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे.

सदर सुविधा केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना पदविका अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत अचूक मार्गदर्शन करण्यात येणार असून प्रवेश प्रक्रिया कशी राबविली जाते, प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात, विद्यार्थ्यांना शासनाकडून कोणत्या शिष्यवृत्ती सुविधा दिल्या जातात तसेच विविध शासनाच्या व खाजगी कंपन्यांमार्फत देण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक कर्ज योजना याबाबत विस्तृतपणे समुपदेशनाची सुविधा या केंद्रामार्फत करण्यात आलेली आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी दिली. तरी करमाळा, कर्जत तसेच दौंड इंदापूर बारामती या तालुक्याच्या ग्रामीण भागातील जास्तीज जास्त विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी सदर सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी केले आहे.
close