*स्वातंत्र्य दिनी गौराईमळा प्राथमिक शाळेत झाडांचे वृक्षारोपण*
*गुणवंत व स्पर्धा परीक्षा यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार.*
इंदापूर: दि 15 भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौराईमळा येथे विविध उपक्रम घेत उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रम घेत साजरा करण्यात आला. *प्रभात फेरी , ध्वजारोहण , राष्ट्रगीत , ध्वजगीत , महाराष्ट्र गीत , प्रतिज्ञा , गुणवंत विद्यार्थी सत्कार , विद्यार्थी भाषणे , बक्षिसे वितरण , खाऊ वाटप करण्यात आला.*
शाळेचे माजी विद्यार्थी व सामाजिक क्षेत्रात सतत अग्रभागी असणारे सन्मान दिपक शिंगाडे पाटील यांनी शाळेची गरज ओळखुन शाळेसाठी टर्मेलिया व फाॅक्सटेल या वृक्षाचे रोपण करण्यासाठी सर्व खर्च करुन सिंहाचा वाटा उचलला.या वेळी त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
इंदापुर पंचायत समिती मार्फत सन २०२३ :२०२४ मघ्ये घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेतील सर्व उत्तीर्ण मुलांचा सत्कार पॅड व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला .मुलांनी देशभक्ती पर गीत सादर करुन उपस्थितीत पालकांची मने जिंकली या कार्यक्रमासाठी ११०० रुपये जमा झाले. गाने बसविण्यसाठी हिना शेख व उपक्रमशील शिक्षिका पठाण मॅडम यांनी विशेष प्रयत्न केले. विद्यार्थी भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली. अध्यक्ष अमोलजी नाझरकर व नानासाहेब नाझरकर यांचे वतीने वही पेन या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
सर्व मुलांचा १ लाख रुपयाचा विमा विमा प्रती विद्यार्थी ३५ रुपय भरुन शेळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ .रेश्माताई जाधव यांनी शाळा दत्तक घेऊन उतरवला त्यामुळे मुलांना जिल्हा परिषद शाळेत पोस्टा मार्फत विमा कवच प्राप्त झाले.
यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष तात्यासाहेब शिंगाडे , किसन जाधव,अनिल शिंगाडे , राहुल नाझरकर , शिंगाडे डाॅक्टर , संजय वायसे ,अर्जुन वायसे ,भारत जाधव ,सचिन शिंगाडे, किसन जाधव, जयसिंग जाधव, किरण जाधव, पशुराम शिंगाडे , राजू शिंगाडे ,विठ्ठल शिंगाडे ,अमित जाधव, समिर शिंगाडे , प्रविण जाधव , अंबादास जाधव , दासा शिंगाडे , अभिजित पवार,विजय शिरसट,हनुमंत सुतार,गणेश रावण ,मल्हारी जाधव , सुरेश शिंगाडे अनिल शिंगाडे ,धनश्री जाधव,मनीषा जाधव,अनुराधा शिंगाडे , सौ घायाळ,रेश्मा शेख,ज्योती होले, शीतल नाझरकर,पूनम जाधव, वर्षा जाधव,शांता जाधव,विद्यार्थी , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन उपशिक्षिका जुबेदा पठाण मॅडम , अंगणवाडी सेविका सुनिता जाधव , मदतनीस कल्पना जाधव यांनी केले. सुत्रसंचालन , स्वागत व आभार मुख्याध्यापक प्रताप शिरसट सर यांनी केले.