इंदापूर: शैक्षणिक संकुलातील 78 व्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण *बावडा लाखेवाडी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या व इसमाच्या सह अध्यक्षा सौ अंकिताताई पाटील-ठाकरे* यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कामधेनू सेवा परिवाराचे समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे यांनी भूषवले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अंकिताताई पाटील ठाकरे म्हणाल्या, देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झालेली आहेत. देश स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली त्यांना आजच्या या दिनी मी विनम्र अभिवादन करते. श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी ची स्थापना 1952 सली कै. कर्मयोगी भाऊंनी केली. संस्थेचा प्रगतीचा आलेख हा उत्तरोत्तर उंचावलेला दिसून येतो. कर्मयोगी भाऊंनी लावलेले छोटेसे रोपट आज वटवृक्षात रूपांतरित झालेल्या दिसून येते. सध्या स्थितीला या शैक्षणिक संकुलामध्ये तब्बल 5000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याचं सर्व श्रेय आपले लाडके नेते राज्याची माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांना जाते. संस्थेच्या वतीने नेहमीच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. या शैक्षणिक संकुलामध्ये काम करणारा प्रत्येक शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग विद्यार्थ्यांच्या कला क्रीडा संस्कृतीक शैक्षणिक गुणवत्ता या क्षेत्रात उंच भरारी घेण्यासाठी सदैव तत्पर आहे. देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्कृष्ट कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे प्राचार्य आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांनी केलेले दिसून येत आहे. यावेळी त्यांनी सर्वांना स्वतंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक उदयसिंह पाटील, संस्थेचे सचिव किरण पाटील, संस्थेचे मा. सचिव सुधीर पाटील, बावडा गावच्या सरपंच सौ पल्लवीताई गिरमे, उपसरपंच रणजीत अशोक घोगरे, संस्थेचे संचालक स्वप्निल घोगरे, संतोष सूर्यवंशी, संजय घोगरे, प्रसाद पाटील, विठ्ठल घोगरे, इंदापूर तालुका विकास आघाडीचे बावडा शाखेचे अध्यक्ष रंजीत घोगरे, माजी सरपंच समीर मुलानी, मा. प्राचार्य श्री गोरे सर ,श्री खाडे सर, दादासाहेब गिरमे, सामाजिक कार्यकर्ते सचिन सावंत, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व संचालक पवन घोगरे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन हरिभाऊ बागल , अच्युत कांबळे व बावडा आणि बावडा पंचक्रोशीतील मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी व त्यांचे सर्व सहकारी पत्रकार बंधू यावेळी उपस्थित होते.
तसेच यावेळी कै. दत्तात्रेय पाटील गुरुजी यांच्या सुविद्य पत्नी सुमन दत्तात्रय पाटील त्यांचा चिरंजीव सुनील दत्तात्रय पाटील हेही उपस्थित होते. त्यांच्या वतीने विद्यालयातील इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना गुणांक्रमे प्रथम क्रमांकास 5000 रुपये द्वितीय क्रमांकास 3000 रुपये तिथे तृतीय क्रमांकास 2000 रुपये या शैक्षणिक संकुलामध्ये नियोजित स्थापन होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्यास पाच हजार रुपये देणगी दिली.
यावेळी *विद्यालयाचे प्राचार्य घोगरे डी आर सर* यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले .अध्यक्ष सूचना विद्यालयाचे उप प्राचार्य जगताप जीं जे सर यांनी मांडली व त्यास अनुमोदन विद्यालयाचे पर्यवेक्षक हासे डी व्ही यांनी दिले .
यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य मोहिते व्ही के सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लहू वावरे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुरव विनायक, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक एचडी घोगरे, वस्तीग्रह अधीक्षक राहुल सुक्रे व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता.
1000 महिला पालक व 1200 पुरुष पालक या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.त्याचबरोबर माजी सैनिक उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या शैक्षणिक संकुलामध्ये सुंदर अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही आयोजन केले होते. याचा पालकांनी आस्वाद घेतला. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नियोजन या शैक्षणिक संकुलातील सर्व अध्यापक बंद भगिनींनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मुलानी एस टी यांनी केले. माजी सैनिक पतसंस्था इंदापूर यांच्यावतीने विद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांसाठी दहा डझन वह्या देण्यात आल्या. यावेळी या संस्थेचे चेअरमन सुखदेव काटे इंदापूर माजी सैनिक पतसंस्थेचे संचालक लक्ष्मण बागल व श्री राम हरी मोरे हेही उपस्थित होते तसेच कैलासवासी दिलीप भाऊ लोखंडे यांचे स्मरणार्थ श्री संतोष लोखंडे यांनी वस्तीगृहातील गरीब विद्यार्थ्यांसाठी पाच डझन क्वायर बुक वह्या दिल्या. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने माननीय सो अंकिताताई पाटील यांच्या शुभहस्ते त्याला श्वासिशाजीराव पाटील कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपणाचे ही आयोजन केले होते.कार्यक्रमाचे नियोजन व शिस्तबद्धता याबद्दल पालक वर्ग व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे व शैक्षणिक संकलातील अध्यापक शिक्षक बंधू भगिनी व कर्मचाऱ्यांची कौतुक केले.