इंदापूर: जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी लाखेवाडी* यांच्या संयुक्त विद्यमाने 15 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७८ व्या दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ध्वजारोहण, राष्ट्रगीत, राज्यगीत, झेंडागीत, संचलन, कवायत, विद्यार्थी व भाषणे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
प्रशालेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीताचे नयनरम्य असे नृत्याविष्कार सादर केले सादर केले अवघा लाखेवाडी परिसर अनोख्या आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. तसेच देशभक्तीपर गीतांनी व योगासन नृत्याने सर्व प्रेक्षकांना आकर्षित व रोमांचित केले.
तरुणांच्या श्वासात देशभक्ती रुजवण्यासाठी भारतीय स्वातंतत्र्याचा ७८ वा दिन आयोजन प्रशालेमध्ये विविध माध्यमातून करण्यात आले.
मनात तिरंगा, ध्यानात तिरंगा,
शान तिरंगा, प्राण तिरंगा,
प्रत्येकाच्या घरोघरी तिरंगा, आपल्या सर्वांचा धर्म तिरंगा याप्रमाणे रंगबेरंगी रांगोळीचा सडा, आकर्षक फलक लेखन, विद्यार्थी बैठक व्यवस्था, मैदानावरील सर्व झाडांवरती तिरंगा , चराचरात, कणाकणात तिरंगा दिसत होता.
कार्यक्रमासाठी लाखेवाडी गावच्या सरपंच सौ चित्रलेखा ढोले, उपसरपंच, पदाधिकारी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. नेत्रदीपक कार्यक्रम राबवून भारतीय स्वातंतत्र्याचा ७८ वा दिन दैदिप्यमान, दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्षा व लाखेवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. चित्रलेखा ढोले मॅडम यांना प्रभात या दैनिकातर्फे आदर्श सरपंच पुरस्काराने गौरवण्यात आले होते त्यानिमित्त त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला .
संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.श्रीमंतजी ढोले सर यांनी 'भारत माता की जय' 'वंदे मातरम' अशा घोषणातून भाषणाची सुरुवात केली. पारतंत्र्यापासून ते स्वातंत्र्यापर्यंत बलिदान देणाऱ्या व्यक्तीची आठवण व विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे तोंडभरून कौतुक केले.सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षण मिळेल असे आश्वासन दिले, आपल्या संस्थेतून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील व विद्यार्थ्यांनी यश संपादन करून आपला नावलौकिक करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
संस्थेचे सचिव श्री. हर्षवर्धन खाडे सर व सहसचिव सौ.पौर्णिमा खाडे मॅडम, मुख्य सल्लागार श्री प्रदीप गुरव साहेब यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासक व विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य. श्री. गणेश पवार, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य श्री सम्राट खेडकर, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य. श्री राजेंद्र सरगर, सर्व विभागाचे सुपरवायझर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.