*बांडेवाडी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.*
*गुणवंत व स्पर्धा परीक्षा यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार.*
इंदापूर: दि 15 भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांडेवाडी येथे विविध उपक्रम घेत उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रम घेत साजरा करण्यात आला. *प्रभात फेरी , ध्वजारोहण , राष्ट्रगीत , ध्वजगीत , महाराष्ट्र गीत , प्रतिज्ञा , गुणवंत विद्यार्थी सत्कार , विद्यार्थी भाषणे , बक्षिसे वितरण , खाऊ वाटप करण्यात आला.*
शाळेची माजी विद्यार्थी *आकांक्षा वागजकर हीने इ 10 वी प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल व स्वरा हेगडे हीची नवोदय विद्यालय निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.* यावेळी माजी सरपंच तथा सदस्य भालचंद्र बांडे , जनार्धन गावडे सर , पोलीस अमोल वागजकर यांनी मनोगते व्यक्त केली. विद्यार्थी भाषणे उपस्थितांची मने जिंकली. अध्यक्ष बापुसो राहिगुडे यांचे वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी राजू मुलाणी , सुहास बांडे , आण्णासाहेब बांडे , सचिन बांडे , संतोष डोंगरे , सचिन बांडे , रंगनाथ बांडे , पिंटू जावळे , भुषण बांडे , आप्पा बांडे , महिला , विद्यार्थी , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन उपशिक्षिका कांचन रणपिसे , अंगणवाडी सेविका सुनंदा पोंदकुले , मदतनीस उर्मिला बांडे यांनी केले. सुत्रसंचालन , स्वागत व आभार मुख्याध्यापक संतोष हेगडे यांनी केले.